कायमस्वरूपी युद्धबंदीच्या बदल्यात ओलिसांची सुटका करणार : हमास   

कैरो : ट्रम्प यांच्या इशार्‍यानंतर दहशतवादी गट हमासने ओलिसांना सोडण्यास नकार दिला आहे. गाझा पट्टीमध्ये कायमस्वरूपी युद्धबंदीच्या बदल्यात उर्वरित इस्रायली ओलिसांची सुटका केली जाईल असे हमाने स्पष्ट सांगितले आहे.हमासने ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर जानेवारीत झालेल्या युद्धविराम करारातून माघार घेतल्याचा आरोप केला आहे. करारामध्ये चर्चेच्या दुसर्‍या टप्प्याची आवश्यकता आहे. यामध्ये अधिक पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात इस्रायलच्या ओलिसांची सुटका, कायमस्वरूपी युद्धविराम आणि गाझामधून इस्रायलची माघार यांचा समावेश असेल.
 
हमासचे प्रवक्ते अब्देल लतीफ अल-कनौआ म्हणाले, उर्वरित इस्रायल ओलीस सोडवण्याचा सर्वोत्तम मार्ग हा चर्चेचा दुसरा टप्पा होता, जो फेब्रुवारीच्या सुरुवातीला सुरू होणार होता. मात्र, आतापर्यंत केवळ मर्यादित प्राथमिक चर्चा झाल्या आहेत. हमासने अजूनही इस्त्रायल-अमेरिकन अदान अलेक्झांडरसह २४ नागरिकांना ओलीस ठेवल्याचे मानले जात आहे. हमासकडे आणखी ३४ जणांचे मृतदेह आहेत, जे एकतर सुरुवातीच्या हल्ल्यात मारले गेले किंवा पकडले गेले.

Related Articles