इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास मनाई : जिल्हाधिकारी   

पुणे : श्री क्षेत्र देहू येथे श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा २०२५ निमित्त १४ ते १६ मार्च या यात्रा कालावधीत इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यास मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
 
श्री क्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीच्या दोनही तीरावरील पाणी पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी उपाययोजना आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तथापी जे पाणी भांडी घासणे तसेच अन्य कारणासाठी वापराता येईल. तसेच देहूतील ठिकठिकाणी असलेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नळाचे पाणी पिण्यासाठी वापरावे. इंद्रायणी नदीच्या पात्रात कोणतेही कपडे धुवू नयेत अगर कोणत्याही प्रकारे नदीचे पाणी दूषित होईल असे कृत्य करू नये. सदर दूषित पाणी पिल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात येवू शकते. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डुडी यांनी दिला आहे.

Related Articles