विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव   

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने चॅम्पियन्स चषकाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच क्रिकेट इतिहासात आपले नाव कोरले. कारण एकदिवसाच्या क्रिकेटमधील हा त्याचा ३०० वा सामना ठरला. याचबरोबर विराट कोहली ३०० एकदिवसाच्या सामन्यांचा टप्पा ओलांडणारा ७ वा भारतीय आणि एकूण १८वा क्रिकेटपटू ठरला. विराटवर देशभरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे. ३०० व्या एकदिवसाच्या सामन्यांबरोबरच, कोहली किमान १०० कसोटी आणि १०० टी-२० सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. आतापर्यंत एकूण १८ क्रिकेटपटूंनी आपापल्या देशांसाठी ३०० एकदिवसाचे सामने खेळले आहेत परंतु त्यापैकी कोणीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इतर दोन्ही स्वरूपात १०० सामने खेळलेले नाहीत.न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी २९९ एकदिवसाच्या सामन्यांमध्ये विराटने ५८.२० च्या सरासरीने आणि ९३.४१ च्या स्ट्राईक रेटने १४,०८५ धावा केल्या होत्या. विराटने एकदिवसाच्या क्रिकेटमध्ये १४,००० धावा पूर्ण करताना अनेक विक्रम आपल्या नावावर केले. तो एकदिवसाच्या क्रिकेटमध्ये ८,००० धावा (१७५ डाव), ९,००० धावा (१९४ डाव), १०,००० धावा (२०५ डाव), ११,००० धावा (२२२ डाव), १२,००० धावा (२४२ डाव), १३,००० धावा (२८७ डाव) आणि १४,००० धावा (२९९ डाव) वेगाने पूर्ण करणारा भारतीय फलंदाज ठरला  न्यूझीलंडविरुद्धचा सामना कोहलीच्या एकदिवसाच्या कारकिर्दीतील ३०० वा सामना ठरला. मैदानावर उतरताच, कोहली भारतासाठी ३०० किंवा त्याहून अधिक एकदिवसाचे सामने खेळणारा सातवा खेळाडू ठरला.
 

Related Articles