E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हे कलाकाराचे उद्दिष्ट असावे
Wrutuja pandharpure
06 Apr 2025
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी यांचे प्रतिपादन
पुणे
: कोणत्याही कलाकारास त्याची सर्वोत्तम भूमिका कोणती असे विचारल्यास त्याचे उत्तर देणे अवघड असते. कारण शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत आपली भूमिका पोहोचविणे हे खर्या कलाकाराचे एकमेव उद्दिष्ट असते. रसिकांच्या मनात त्या कलाकाराच्या एखाद्या भूमिकेने घर केलेले असते, असे मत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे विश्वमराठी एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंकणी बोलत होते. भांडारकर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला शीतल शहा, प्रमोद जोशी, सूर्यकांत वझे, अविनाश ओगले आणि लीना गोगटे आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
मंकणी म्हणाले, सीओईपी सारख्या नावाजलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या मला अभिनयाने खेचून घेतले. यामागे शालेय जीवनात मी करीत असलेल्या भूमिकांना शिक्षकांनी दिलेले प्रोत्साहन हे एक कारण होते. घरातही साहित्य, संस्कृती आणि कलेचे वातावरण असल्याने तसेच आई-वडिलही अभिनय क्षेत्रात असल्याने बालवयात माझ्यावर नाट्यसंस्कार झाले. मी मला मिळत गेलेल्या भूमिकांमध्ये सातत्याने नाविण्याचा शोध घेत राहिलो. नवनवीन प्रयोग करीत ती भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत राहिलो.
माधव वझे म्हणाले, प्रेक्षकांसमोर नाट्यकर्मी आणि नाट्यकर्मींसमोर प्रेक्षक असल्याशिवाय नाटक होऊ शकत नाही, या मतावर मी आजही ठाम असलो तरी, काळाची पाऊले ओळखत नाटक जीवंत राहण्यासाठी जे जे मार्ग अवलंबता येतील ते ते मार्ग अवलंबले पाहिजे, असे मला वाटते. शीतल शहा, प्रमोद जोशी, भरत फाटक, अविनाश ओगले,लीना गोगटे यांनी मनोगत व्यक्त केले. सूर्यकांत वझे यांनी प्रास्ताविक केले. माधुरी मराठे यांनी सूत्रसंचालन केले. कविता अभ्यंकर यांनी आभार मानले.
Related
Articles
भजन, कीर्तनात रमले भाविक
13 Apr 2025
परिचारिकांच्या तत्परतेमुळे वाचले डेमू रेल्वेतील युवतीचे प्राण
16 Apr 2025
छत्तीसगढमध्ये २२ नक्षलवाद्यांना अटक
18 Apr 2025
युक्रेनचे लढाऊ विमान पडले; वैमानिक ठार
16 Apr 2025
बाणेर-पाषाण लिंक रस्ता चार महिन्यांत पूर्ण करा
18 Apr 2025
वाचक लिहितात
18 Apr 2025
भजन, कीर्तनात रमले भाविक
13 Apr 2025
परिचारिकांच्या तत्परतेमुळे वाचले डेमू रेल्वेतील युवतीचे प्राण
16 Apr 2025
छत्तीसगढमध्ये २२ नक्षलवाद्यांना अटक
18 Apr 2025
युक्रेनचे लढाऊ विमान पडले; वैमानिक ठार
16 Apr 2025
बाणेर-पाषाण लिंक रस्ता चार महिन्यांत पूर्ण करा
18 Apr 2025
वाचक लिहितात
18 Apr 2025
भजन, कीर्तनात रमले भाविक
13 Apr 2025
परिचारिकांच्या तत्परतेमुळे वाचले डेमू रेल्वेतील युवतीचे प्राण
16 Apr 2025
छत्तीसगढमध्ये २२ नक्षलवाद्यांना अटक
18 Apr 2025
युक्रेनचे लढाऊ विमान पडले; वैमानिक ठार
16 Apr 2025
बाणेर-पाषाण लिंक रस्ता चार महिन्यांत पूर्ण करा
18 Apr 2025
वाचक लिहितात
18 Apr 2025
भजन, कीर्तनात रमले भाविक
13 Apr 2025
परिचारिकांच्या तत्परतेमुळे वाचले डेमू रेल्वेतील युवतीचे प्राण
16 Apr 2025
छत्तीसगढमध्ये २२ नक्षलवाद्यांना अटक
18 Apr 2025
युक्रेनचे लढाऊ विमान पडले; वैमानिक ठार
16 Apr 2025
बाणेर-पाषाण लिंक रस्ता चार महिन्यांत पूर्ण करा
18 Apr 2025
वाचक लिहितात
18 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
2
विचारांची पुंजी जपायला हवी
3
शुल्कवाढीचा भूकंप
4
नेपाळ पुन्हा राजेशाहीच्या दिशेने?
5
निकाल लवकर लागो (अग्रलेख)
6
सर्वात खास तारीख