जंगलाच्या १३ हजार चौरस किलोमीटर भागांत अतिक्रमण   

२५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून केंद्राला अहवाल

नवी दिल्ली : देशातील जंगलातील बहुतांश भागात अतिक्रमण झाल्याचा एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.. त्यामध्ये २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे १३ हजार चौरस किलोमीटरच्या जंगलात अतिक्रमण झाल्याचे नमूद केले आहे. 
 
दिल्ली, सिक्कीम आणि गोव्यासह २५ राज्ये आणि केंद्रशशित प्रदेशातील जंगलात अतिक्रमण वाढले आहे, असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालातील आकडेवारीत नमूद केले आहे. दहा राज्यांनी अजूनही त्यांचा अहवाल दिलेला नाही. गेेल्या वर्षी राष्ट्रीय हरित लवादााने स्वत:हून या बाबीची गांभीयाने दखल घेतली होती. अहवालानुसार ७ लाख ५० हजार ६४८ हेक्टर (७ हजार ५०६. ४८ चौरस किलोमीटर) च्या जंगलात अतिक्रमण झाले. ते दिल्ली राज्याच्या आकारापेक्षा चौपट आहे. पर्याचरण मंत्रालयाने राष्ट्रीय हरित लवादाला गेल्या वर्षी एप्रिलमध्ये निर्देश दिले होते की, जंगलात झालेल्या अतिक्रमणााबाबतचा तपशील द्यावा.  त्यानुसारच्या अहवालात नमूद केले आहे की, मार्च २०२४ अखेर एकूण १३ लाख ५ हजार ६६८. १ हेक्टर (१३ हजार ५६ चौरस किलोमीटर) जंगली भागात अतिक्रमण झाले. 

Related Articles