E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
सर्वसामान्य जनतेच्या खिशाला दूध दरवाढीची झळ
Wrutuja pandharpure
24 Mar 2025
माझेही मत, बाळकृष्ण शिंदे
’दुधाची दरवाढ’ हे संपादकीय (दैनिक केसरी दि.२२ मार्च) वाचले. दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे. उन्हाळ्यामुळे दूध संकलनात झालेली घट आणि आइसक्रीमसह मागणी वाढल्याने तसेच उन्हाळ्यातील चारा आणि पाणीटंचाईमुळे दूध उत्पादन खर्चात वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकर्यांना अधिकचा भाव देण्यासाठी; आदीं कारणे या दूध दरवाढीमागे सांगण्यात आली आहेत. वरकरणी प्रति लिटर दोन रुपयांची दरवाढ तुटपुंजी वाटत असली तरी दुधाचा दैनंदिन खर्च आणि नाशीवंत प्रकृती बघता सर्वसामान्य जनतेच्या खिशाला या दरवाढीची झळ बसणार आहे.’
शेतकरी आंदोलन करतो त्यामुळे तो नजरेस येतो. या व्यवसाय साखळीतील इतर घटक आंदोलन करत नाहीत; कारण त्यांना त्यांचा नफा न मागता दर वाढवून मिळत असतो. शेतकर्यांचा दूध उत्पादनावर खर्च दिवसेंदिवस वाढतो आहे. एक लिटर दूध मिळवण्यासाठी शेतकर्याला दुभत्या जनावरांच्या दोन टक्के (पाचशे किलो वजनाची गाय असेल तर दहा किलो) आणि ती देत असलेल्या दुधाच्या एक तृतीयांश (तीन किलो) इतके खाद्य नियमितपणे द्यावे लागते. रोज दहा लिटर दूध देणार्या एकट्या जनावरांच्या केवळ खाद्यावर शेतकर्याला रोज ३०० - ३५० रुपये खर्च येतो. शारीरिक कष्ट वेगळेच ! शेतकर्यांकडून कमी दराने संकलित केलेले दूध मात्र ग्राहकांना दोन ते अडीच पट जास्त किंमतीत विकले जाते. मधल्या साखळीतील विक्री घटक आपले नफ्याचे प्रमाण कमी करीत नाहीत. या नफेखोर घटकांनी जर आपल्या दूध विक्री नफ्यातील प्रमाण ५५ - ६० टक्क्यांपर्यंत खाली आणले तर शेतकर्याला उत्पादन खर्चाच्या ८० टक्के दर मिळू शकतील.
गुजरातमधील आणंदमध्ये ’अमूल’ दुग्धोत्पादन प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवणारे आणि भारतातील धवल क्रांतीचे पितामह आणि अमूल ब्रॅन्डची जगभर ओळख निर्माण करणारे दिवंगत डॉ. वर्गीस कुरियन म्हणत की ’दूध विकत घेऊन पिणे हे सगळ्यांना परवडले पाहिजे. सगळ्यांना परवडेल या दरात चांगल्या दर्जाचे दूध मिळाले पाहिजे.’ पण वास्तव काय आहे ? महाराष्ट्रात दर माणशी दर दिवशी दुधाचे आहारातील प्रमाण अवघे २२२ ग्रॅम आहे. राष्ट्रीय पातळीवर विचार करता हे प्रमाण ३१५ ग्रॅम आहे. तर पंजाब राज्याचा विचार करता हेच प्रमाण ९०० ग्रॅम (१ लिटर) आहे. दर वर्षी साधारण पाच टक्के इतकी वाढ दूध उत्पादनात होते. मात्र आहारातील दुधाचे प्रमाण काही वाढत नाही.
Related
Articles
नववर्षाचा सृष्टिसंकेत
30 Mar 2025
आयसीसीसी, पीसीएस प्रकल्पांसाठी कमीत कमी रस्ते खोदाईचा पालिकेचा प्रयत्न
26 Mar 2025
नेपाळमध्ये १०० आंदोलकांना अटक
30 Mar 2025
अंतरिक्षातून परतल्यावर...!
31 Mar 2025
युक्रेन युद्धातून वाचलेल्या पाच सिंहांचे पुनर्वसन
26 Mar 2025
अत्याधुनिक तेजस विमानांसाठी अमेरिकेकडून इंजिनाचा पुरवठा
26 Mar 2025
नववर्षाचा सृष्टिसंकेत
30 Mar 2025
आयसीसीसी, पीसीएस प्रकल्पांसाठी कमीत कमी रस्ते खोदाईचा पालिकेचा प्रयत्न
26 Mar 2025
नेपाळमध्ये १०० आंदोलकांना अटक
30 Mar 2025
अंतरिक्षातून परतल्यावर...!
31 Mar 2025
युक्रेन युद्धातून वाचलेल्या पाच सिंहांचे पुनर्वसन
26 Mar 2025
अत्याधुनिक तेजस विमानांसाठी अमेरिकेकडून इंजिनाचा पुरवठा
26 Mar 2025
नववर्षाचा सृष्टिसंकेत
30 Mar 2025
आयसीसीसी, पीसीएस प्रकल्पांसाठी कमीत कमी रस्ते खोदाईचा पालिकेचा प्रयत्न
26 Mar 2025
नेपाळमध्ये १०० आंदोलकांना अटक
30 Mar 2025
अंतरिक्षातून परतल्यावर...!
31 Mar 2025
युक्रेन युद्धातून वाचलेल्या पाच सिंहांचे पुनर्वसन
26 Mar 2025
अत्याधुनिक तेजस विमानांसाठी अमेरिकेकडून इंजिनाचा पुरवठा
26 Mar 2025
नववर्षाचा सृष्टिसंकेत
30 Mar 2025
आयसीसीसी, पीसीएस प्रकल्पांसाठी कमीत कमी रस्ते खोदाईचा पालिकेचा प्रयत्न
26 Mar 2025
नेपाळमध्ये १०० आंदोलकांना अटक
30 Mar 2025
अंतरिक्षातून परतल्यावर...!
31 Mar 2025
युक्रेन युद्धातून वाचलेल्या पाच सिंहांचे पुनर्वसन
26 Mar 2025
अत्याधुनिक तेजस विमानांसाठी अमेरिकेकडून इंजिनाचा पुरवठा
26 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
2
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
3
एकाच माळेचे मणी (अग्रलेख)
4
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
5
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
6
‘एआय’ क्षेत्रात २७ लाख युवकांना रोजगार