मद्यधुंद अवस्थेत तरुणाचे भर रस्त्यात अश्लील चाळे   

तरुणाच्या वडिलांनी मागितली माफी 

पुणे : पुण्यामध्ये रोजच कुठे ना कुठे तरी गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी स्वरगेट बस स्थानकावरील घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. ही घटना ताजी असतानाच आता शहरात आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यात शास्त्री रस्त्यावर सकाळच्या वेळेला BMW कारमधील मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने रस्त्यावरच अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणांन येरवडा परिसरात रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या महिलांसमोरच अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामूळे कायदा व्यवस्था, पोलिसाचा धाक आणि पुण्यातील बिघडलेली तरुणाई हे मुद्दे चर्चांचा विषय ठरलेत. 
 
गौरव आहुजा असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. या प्रकरणामुळे शहरातलं  वातावरण चांगलंच तापलं आहे.पुण्यातील शास्त्री रस्त्यावर भर दिवस हे घटना घडल्याने याचा बोलबालाही जोरदार झाला आहे. पुण्यात नंगानाच करणाऱ्या या तरुणाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. गौरव आहुजा याचे वडील मनोज आहुजा यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते, त्याने सिग्नलवर लघुशंका नाही केली तर माझ्या तोंडावर केली आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे, असं मनोज अहुजा यांनी म्हटलं आहे.
 
पुण्याचे पोलीस अधिकारी या प्रकरणात काय भूमिका घेतात हे पाहणे तर महत्वाचे आहेच पण खरंच त्याच्या पालकांवर कारवाई होणार का? या मध्ये त्याच्या पालकांची खरंच चूक होती का? त्याची शिक्षा परत निबंध लिहिण्याची नसेल ना असे अनेक प्रश्न उपस्तीथ झाले आहेत. 

Related Articles