येमेनजवळ चार नौका बुडून १८६ जण बेपत्ता   

कैरो :  येमेनजवळ निर्वासितांच्या चार नौका बुडाल्या असून दोन जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १८६ जण बेपत्ता झाले आहेत. चारही नौका येमेन आणि आफ्रिकेतील डिजबौटी येथील आहेत. येमेन जवळ दोन नौका बुडाल्या. दोन खलांशांची सुटका झाली असून १८१ निर्वासित आणि येमनचे पाच खलाशी बेपत्ता आहेत. अन्य दोन नौका अफ्रिकेतील डिजबौटीतील आहेत. दोन निर्वासितांचे मृतदेह सापडले आहेत. नौकेवरील सर्व जणांची सुटका करण्यात आली. येमेन परिसरात अनेक वर्षांपासून गृहयुद्ध सुरू आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पूर्व आफ्रिकेतून निर्वासित आखाती देशांत काम मिळविण्यासाठी या मार्गाचा वापर करतात.  प्रत्येक वर्षी त्यांंची संख्या शेकडो आणि हजारोंच्या घरात असते. येमेन येथे पोहोचण्यासाठी अनेक जण चोरटा व्यापार करणार्‍यांची मदत घेतात. प्रवाशांनी अनेकदा नौका खचाखच भरल्या जातात. त्यानंतर लाल समुद्र आणि एडनच्या आखातात बुडत असतात. दरम्यान, २०२३ मध्ये ९७ हजार २०० निर्वासितांनी येमेन गाठले होते. २०२१ च्या तुलनेत त्यांची संख्या तिप्पट झाली आहे. 

Related Articles