नवी दिल्ली : जेकेएलएफ प्रमुख यासिन मलिक आणि अन्य सहआरोपींविरुद्धचा खटला जम्मू-काश्मीरमधून दिल्लीला स्थानांतरित करण्यासाठी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या अर्जावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने ४ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. यासीन सध्या तिहारच्या तुरुंगात बंद आहे. न्यायमूर्ती अभय एस. ओका आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर हा अर्ज सुनावणीसाठी आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता काल सुनावणीस उपलब्ध नव्हते. त्यामुळे खंडपीठाने सुनावणी पुढे ढकलली. या सुनावणीसाठी मलिक याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले.
Fans
Followers