सर्व ओलिसांना सोडा, अन्यथा कडक कारवाई करू   

ट्रम्प यांचा हमास दहशतवाद्यांना इशारा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमास दहशतवाद्यांना गाझामधील सर्व ओलिसांना सोडण्यासाठी शेवटाचा इशारा दिला आहे.व्हाईट हाऊसच्या आठ माजी ओलिसांच्या भेटीनंतर ट्रम्प यांनी त्यांच्या समाज माध्यमावर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ते इस्राएलला आवश्यक ते सर्व मदत करत आहेत. सर्व ओलिसांना आता सोडा, तुम्ही ज्यांची हत्या केली त्यांचे मृतदेह ताबडतोब स्वाधीन करा, अन्यथा आता तुमच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. केवळ विकृत लोकच मृतदेह ठेवतात, तुम्ही विकृत आहात, असेही ते म्हणाले. यापूर्वी, व्हाईट हाऊसने म्हटले होते, की अमेरिकन अधिकारी हमासच्या अधिकार्‍यांशी सतत चर्चा करत आहेत. ट्रम्प यांनी दहशतवादी संघटनेला दिलेला थेट इशारा म्हणजे आता चर्चा न करता सरळ कारवाई करण्यात येईल.
 

Related Articles