E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
हुंदाई : वेग घेण्याची अपेक्षा
Samruddhi Dhayagude
31 Mar 2025
भाग्यश्री पटवर्धन
युवा वर्ग , ज्यांच्या हातात शेअर बाजारामुळे पैसे खेळतो आहे आणि ज्यांना आकांक्षा आहेत असा मोठा ग्राहक वर्ग हे कार कंपन्यांच्या दृष्टीने लाभदायक आहे. दोन महिन्यापूर्वी रिझर्व बँकेने व्याज दरात कपात केल्याने पुन्हा एकदा मागणीचा जोर आगामी काळात वाढेल आणि कार कंपन्यांचा खप वाढेल असा अंदाज आहे.
सर्वप्रथम वाचकांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपण सर्वांनी चैत्र प्रतिपदा म्हणजे पाडव्याला गुढी उभारून नवे संकल्प केले असतील. त्यात बचत-गुंतवणूक-भविष्यकालीन तरतूद, निवृत्तीचा खर्च याचे काही नियोजन आहे का? जर या प्रश्नाचे उत्तर नाही असे असेल तर थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीचा प्रत्यय यायला हवा असेल तर अजूनही विलंब झालेला नाही. उभारा गुंतवणुकीची गुढी!
क्रिसिल अहवालानुसार वर्ष २०२३ मधील प्रवासी वाहनांच्या विक्रीवर आधारित जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी म्हणून गणल्या गेलेल्या ह्युंदाई समूहाचा एक भाग असलेल्या हुंदाई मोटारीने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी प्राथमिक समभाग विक्री केली. प्रती इक्विटी शेअरसाठी १८६५ रुपये ते १९६० रुपयांपर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला होता. बोली किमान ७ इक्विटी शेअर्ससाठी होती. कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये प्रवर्तक विक्री भागधारक १४२,१९४,७०० इक्विटी शेअरपर्यंतची ऑफर फॉर सेल समाविष्ट होती. आज कंपनीचा शेअर १७१५ रुपयाच्या घरात आहे. याचा अर्थ नोंदणीवेळी असलेला १९३० रुपये हा भावही टिकलेला नाही. दोन्हीमध्ये सुमारे २०० रुपयांहून अधिक फरक दिसतो आहे. प्राथमिक भागविक्रीत ज्यांनी भाग घेतला आणि ज्यांना हे शेअर मिळाले त्यांना आता पस्तावायची वेळ आली का असे वाटत असेल. मात्र भारतात सध्या तरी तशी स्थिती नाही. वाहन उद्योगात विशेषतः प्रवासी वाहन निर्मिती क्षेत्रात मारुती, टाटा, मर्सिडीज यासारखे स्पर्धक असताना हुंदाईच्या कार किती खपणार अशी शंका मनात येणे साहजिक आहे. मात्र युवा वर्ग, ज्यांच्या हातात शेअर बाजारामुळे पैसे खेळतो आहे आणि ज्यांना आकांक्षा आहेत असा मोठा ग्राहक वर्ग हे कार कंपन्यांच्या दृष्टीने लाभदायक आहे.
दोन महिन्यापूर्वी रिझर्व बँकेने व्याज दरात कपात केल्याने पुन्हा एकदा मागणीचा जोर आगामी काळात वाढेल आणि कार कंपन्यांचा खप वाढेल असा अंदाज आहे. हुंदाई ही दुसर्या क्रमांकाची कार उत्पादक कंपनी आहे. तिचे मागील तिमाहीचे निकाल आता पाहू. ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १९ टक्के कमी झाला आहे. १४२५ कोटी रुपयांवरून तो ११६१ कोटी रुपये झाला. अमेरिकेतील सत्ताबदलाने निर्यातीला बसलेला फटका आणि भारतीय बाजारात घसरलेली मागणी हे त्यामागचे कारण ठरले. विजेवर चालणार्या कारच्या बाजारात २० टक्के हिस्सा मिळवण्याचे उद्दिष्ट असल्याचे कंपनीचे संचालक तरुण गर्ग यांचे निवेदन महत्वाचे मानले जाते. यासोबतच चालू म्हणजे नव्या आर्थिक वर्षात प्राप्तिकरात मिळणार्या सवलतींमुळे मागणी वाढेल असा अंदाज आहे. कंपनीच्या शेअरचा कमाल किमान भाव (< १,९७०-१,५५१) असा आहे. तंत्रज्ञानाचा पुढावा लक्षात घेता आगामी काळात व्यवसाय वाढ.
पीपीएफ योजनेत व्याजदरात दुजाभाव का
पीपीएफ ही कोट्यवधी भारतीयांना करमुक्त उत्पन्न्न देणारी सर्वात सुरक्षित योजना. पोस्ट आणि सरकारी बँकात या योजनेत खाते उघडून अनेकांनी आपल्या उतारवयातील चरितार्थाची सोय केली इतकेच नाही तर आणीबाणीच्या प्रसंगी या योजनेतील रक्कम उपयोगी ठरल्याची उदाहरणे आहेत. ज्या नागरिकांनी मूल जन्मताच या योजनेत गुंतवणूक केली त्यांना मुलांच्या शिक्षणाचा, लग्नाचा खर्च पेलणे सोपे झाले. आजही ही योजना आकर्षक आहे कारण तीत मिळणारे उत्पन्न करमुक्त आहे. केंद्र सरकारने मात्र आगामी आर्थिक वर्षांपासून त्यात १८ वर्षाखालील खातेदारांना (मायनर) मिळणार्या व्याजाचे दर कमी केल्याने मोठा अन्याय होणार आहे. मुळात एकाच योजनेत १८ वर्षापर्यंत पोस्टाच्या बचत खात्याइतका म्हणजे चार टक्के व्याजदर आणि १९ व्या वर्षांपासून ७.१ टक्के हा दुजाभाव का केला जातो? महागाईला सामोरे जाताना जे सर्वात सुरक्षित पर्याय आहेत त्यात पीपीएफ असल्याने हा फरक ठेवणे नव्या करपद्धतीत अनावश्यक ठरते असे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी म्हटले आहे.
Related
Articles
एनआयए मुख्यालय परिसराला छावणीचे स्वरुप
12 Apr 2025
पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करण्याची गरज
13 Apr 2025
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसाठी नवीन करार
08 Apr 2025
वाचक लिहितात
10 Apr 2025
पवन, सौर ऊर्जानिर्मितीत जर्मनीला मागे टाकत भारत तिसर्या क्रमांकावर
09 Apr 2025
निर्देशांक उसळला
12 Apr 2025
एनआयए मुख्यालय परिसराला छावणीचे स्वरुप
12 Apr 2025
पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करण्याची गरज
13 Apr 2025
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसाठी नवीन करार
08 Apr 2025
वाचक लिहितात
10 Apr 2025
पवन, सौर ऊर्जानिर्मितीत जर्मनीला मागे टाकत भारत तिसर्या क्रमांकावर
09 Apr 2025
निर्देशांक उसळला
12 Apr 2025
एनआयए मुख्यालय परिसराला छावणीचे स्वरुप
12 Apr 2025
पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करण्याची गरज
13 Apr 2025
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसाठी नवीन करार
08 Apr 2025
वाचक लिहितात
10 Apr 2025
पवन, सौर ऊर्जानिर्मितीत जर्मनीला मागे टाकत भारत तिसर्या क्रमांकावर
09 Apr 2025
निर्देशांक उसळला
12 Apr 2025
एनआयए मुख्यालय परिसराला छावणीचे स्वरुप
12 Apr 2025
पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करण्याची गरज
13 Apr 2025
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसाठी नवीन करार
08 Apr 2025
वाचक लिहितात
10 Apr 2025
पवन, सौर ऊर्जानिर्मितीत जर्मनीला मागे टाकत भारत तिसर्या क्रमांकावर
09 Apr 2025
निर्देशांक उसळला
12 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तनिषा भिसे प्रकरणात मंगेशकर रूग्णालय दोषी
2
ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिका रस्त्यावर
3
काश्मीरमध्ये सत्तेचा वाद (अग्रलेख)
4
एक शाप, दोन वर
5
जागतिक बाजारपेठेत व्यापारयुद्धाचे सावट
6
सात जणांचा जीव घेणाऱ्या बोगस डॉक्टरवर अखेर गुन्हा दाखल