E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
शिक्षिकेचे निलंबन; शिस्तभंग कारवाईचे संकेत
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
गैरहजेरीत त्रयस्थ महिलेकडून अध्ययन
भोर
,(प्रतिनिधी) : नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेतील एका शिक्षिकेने स्वतःच्या गैरहजेरीत परस्पर त्रयस्थ महिलेकडून अध्ययन करून घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व शिक्षक मंडळाचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी संबंधित शिक्षिकेचे बुधवारी तात्पुरते निलंबन केले असून विभागीय चौकशी करून शिस्तभंगाच्या कारवाईचे संकेत दिले आहेत. भारती दीपक मोरे असे या उपशिक्षिकेचे नाव आहे.
येथील महाराणा प्रताप नगरपरिषद शाळा क्रमांक १ मध्ये त्या कार्यरत आहेत. शाळेमध्ये त्या गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी मुख्याधिकार्यांकडे आल्या होत्या. दरम्यान मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी २१ रोजी शाळेस अचानक भेट दिली. त्यावेळी मोरे विनापरवानगी गैरहजर असल्याचे आढळले. तसेच त्यांनी मुलांना शिकवण्यासाठी वर्गात त्रयस्थ महिलेची पर्यायी व्यवस्था केल्याचे आढळले.
चौकशीमध्ये अध्ययनापोटी ठराविक पैसे मोरे देत असल्याचे संबंधित महिलेने सांगितले. इतकेच नव्हे तर मोरे यांनी गैरहजर असताना हजेरीपत्रकात स्वाक्षरी केल्याचे हजेरीपट तपासणीमध्ये निदर्शनास आले आहे. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी तत्काळ मोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून २४ तासात खुलासा मागवला. मोरे यांनी वेळेत खुलासा सादर केला. मात्र तो असमाधानकारक, मोघम व जुजबी असल्याचे नमूद करून प्रशासनाने फेटाळला.
निदर्शनास आलेल्या बाबी
शाळेत विनापरवानगी गैरहजर राहणे. विनापरवानगी मुख्यालय सोडणे. नेमून दिलेल्या कर्तव्यात कसूर करणे. गैरहजेरीच्या काळात खासगी महिलेकडे वर्गाचा ताबा देणे. वर्ग उघडा ठेवून कुलपाच्या किल्ल्या दुसर्याकडे देणे. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तावाढ कामकाजात अडथळा निर्माण करणे. विद्यार्थी सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण करणे. विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अध्ययन तपासले असता गुणवत्ता विषयक प्रगती समाधानकारक नसणे, आदी बाबी प्राथमिक तपासणीत आढळल्या. त्यामुळे बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम २००९ नागरी सेवेतील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी विभागीय चौकशी करून शिस्तभंग कारवाई करण्याचे प्रस्तावीत केले आहे. निलंबन काळात मोरे यांचे मुख्यालय नगरपरिषद कार्यालय असून पूर्व परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Related
Articles
फडणवीस यांच्या काकू भाजप नेत्यांवर रागावल्या
08 Apr 2025
कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
10 Apr 2025
भाजपला २,२४३ कोटींच्या देणग्या
08 Apr 2025
तहव्वूर राणावरुन भाजप, काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू
11 Apr 2025
पवन कल्याण यांचा मुलगा आगीत जखमी
09 Apr 2025
हुरियत कॉन्फरन्सला आणखी तीन गटांची सोडचिठ्ठी
08 Apr 2025
फडणवीस यांच्या काकू भाजप नेत्यांवर रागावल्या
08 Apr 2025
कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
10 Apr 2025
भाजपला २,२४३ कोटींच्या देणग्या
08 Apr 2025
तहव्वूर राणावरुन भाजप, काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू
11 Apr 2025
पवन कल्याण यांचा मुलगा आगीत जखमी
09 Apr 2025
हुरियत कॉन्फरन्सला आणखी तीन गटांची सोडचिठ्ठी
08 Apr 2025
फडणवीस यांच्या काकू भाजप नेत्यांवर रागावल्या
08 Apr 2025
कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
10 Apr 2025
भाजपला २,२४३ कोटींच्या देणग्या
08 Apr 2025
तहव्वूर राणावरुन भाजप, काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू
11 Apr 2025
पवन कल्याण यांचा मुलगा आगीत जखमी
09 Apr 2025
हुरियत कॉन्फरन्सला आणखी तीन गटांची सोडचिठ्ठी
08 Apr 2025
फडणवीस यांच्या काकू भाजप नेत्यांवर रागावल्या
08 Apr 2025
कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
10 Apr 2025
भाजपला २,२४३ कोटींच्या देणग्या
08 Apr 2025
तहव्वूर राणावरुन भाजप, काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू
11 Apr 2025
पवन कल्याण यांचा मुलगा आगीत जखमी
09 Apr 2025
हुरियत कॉन्फरन्सला आणखी तीन गटांची सोडचिठ्ठी
08 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
4
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
5
संयत आणि वास्तवदर्शी प्रतिभावंत
6
राज्यात आठवडाभर पावसाचा अंदाज