E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
पीडित तरुणीचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह; पत्राद्वारे खदखद व्यक्त
पुणे
: स्वारगेट अत्याचार प्रकरणातील तरुणीने पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. त्यासाठी तिने पत्राचा आधार घेत आपली खदखद व्यक्त केली आहे. प्रधान सचिवांना दिलेल्या पत्रात तिने वैद्यकीय चाचणी, पोलिसांची भूमिका आणि सरकारी वकिलांच्या नियुक्तीबाबत आलेल्या धक्कादायक अडचणी स्पष्ट केल्या आहेत. या आरोपांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यपध्दतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील तरुणीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नुकतीच भेट घेतली आहे. तसेच, तरुणीने प्रधान सचिवांना एक पत्र सुध्दा लिहिले आहे. या पत्रात तिने मोठी मागणी केली आहे. असीम सरोदे यांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. तसेच, पुणे पोलिसांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. पत्रात पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. पत्रात अत्याचाराच्या घटनेचा उल्लेख करताना तिने म्हटले की, पुरूष वैद्यकीय अधिकारी माझी इच्छा नसताना सुध्दा संमती घ्यायचे. त्यानंतर माझी वैद्यकीय चाचणी करायचे. अनेक पुरूष पोलीस अधिकार्यांनी माझ्यावर अत्याचार कसा झाला हे सांगायचे. मला तीन वकिलांची नावे सूचविली आहेत. यातून एक निवडावा, असे सांगण्यात आले. मात्र, नंतर मला विचारले देखील नाही. मला माझा वकील निवडण्याचा अधिकार नाही का? असा धक्कादायक आरोप तरूणीने केला आहे.
ती पुढे म्हणाली की, याबाबत मी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यांना लेखी पत्र देऊन वकील असीम सरोदेंची नेमणूक करण्याची मागणी केली होती. पण त्यांनी मला इत्तर वकिलांची नावे सुचवली. एका अन्यायग्रस्त पीडितेच्या मताला काहीच महत्व नाही, असा कोणता कायदा आहे का? असा सवालही तिने या पत्रातून केला आहे. यानंतर तरूणीने आरोपीबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. आरोपी दत्ता गाडेने तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला असल्याचे तिने पत्रात नमूद केले आहे. तसेच, आरोपीने तिसर्यांदा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तेव्हा मी पूर्ण ताकदीने विरोध केला. त्यानंतर गाडेने पळ काढला, असे तिने या पत्रात लिहिले आहे.
पुढील कारवाईकडे लक्ष
तरुणीच्या आरोपांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पीडित महिलांना न्याय मिळावा, यासाठी तिने स्वतः सरकारी वकील निवडण्याचा अधिकार असावा, अशी मागणी केली आहे. मात्र, या मागणीला पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे तिला चांगला वकील न्यायदानासाठी मिळाला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मात्र, एकंदरीत पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेवर आणि तरुणीच्या मागण्यांवर पुढे काय कारवाई होते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
Related
Articles
डिंभे धरणात २६ टक्के पाणीसाठा
11 Apr 2025
’नीट’च्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन
12 Apr 2025
दहशतीला लगाम (अग्रलेख)
08 Apr 2025
बीएसई : गुंतवणूकदारांच्या पारड्यात भरभरून माप
08 Apr 2025
वणव्यात आंब्याच्या बागेचे नुकसान
12 Apr 2025
माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल प्रशासनाला सादर
12 Apr 2025
डिंभे धरणात २६ टक्के पाणीसाठा
11 Apr 2025
’नीट’च्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन
12 Apr 2025
दहशतीला लगाम (अग्रलेख)
08 Apr 2025
बीएसई : गुंतवणूकदारांच्या पारड्यात भरभरून माप
08 Apr 2025
वणव्यात आंब्याच्या बागेचे नुकसान
12 Apr 2025
माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल प्रशासनाला सादर
12 Apr 2025
डिंभे धरणात २६ टक्के पाणीसाठा
11 Apr 2025
’नीट’च्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन
12 Apr 2025
दहशतीला लगाम (अग्रलेख)
08 Apr 2025
बीएसई : गुंतवणूकदारांच्या पारड्यात भरभरून माप
08 Apr 2025
वणव्यात आंब्याच्या बागेचे नुकसान
12 Apr 2025
माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल प्रशासनाला सादर
12 Apr 2025
डिंभे धरणात २६ टक्के पाणीसाठा
11 Apr 2025
’नीट’च्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन
12 Apr 2025
दहशतीला लगाम (अग्रलेख)
08 Apr 2025
बीएसई : गुंतवणूकदारांच्या पारड्यात भरभरून माप
08 Apr 2025
वणव्यात आंब्याच्या बागेचे नुकसान
12 Apr 2025
माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल प्रशासनाला सादर
12 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
4
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
5
संयत आणि वास्तवदर्शी प्रतिभावंत
6
राज्यात आठवडाभर पावसाचा अंदाज