E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मुख्यमंत्री व मंत्र्यांचे वर्तन घटनाविरोधी
Samruddhi Dhayagude
27 Mar 2025
काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले
मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी असते. परंतु, दुर्दैवाने महायुती सरकार जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याकरिता धर्मांधतेचे विष पसरवत आहे. भाजपच्या परिवारातील संस्था औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलन करतात आणि मंत्री व मुख्यमंत्री वक्तव्ये करतात. राज्यातील आजची परिस्थिती पाहता राज्य सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून मुख्यमंत्री आणि मंत्री यांची वर्तणूक राज्यघटनाविरोधी आहे. त्यामुळे हे राज्य सरकार तात्काळ बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन नागपूर हिंसाचारासह राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर निवेदन दिले. या शिष्टमंडळात विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत आदी नेते उपस्थित होते.
या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, राज्याचे मत्स्यपालन व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी राजकीय फायद्यासाठी दोन धर्मांत तेढ निर्माण व्हावे, या उद्देशाने सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहेत. असे असतानाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे; याचाच अर्थ राज्यातील सामाजिक सौहार्द आणि शांतता बिघडावी, हे राज्य सरकारचे धोरण आहे. औरंगजेबाची कबर ही केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे. अशा केंद्र सरकार संरक्षित वास्तूचे संरक्षण करण्याची राज्य सरकारचीही तितकीच जबाबदारी आहे, असे असतानाही भाजपचे मातृसंस्था असणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सारख्या संस्था औरंगजेबाच्या कबरीविरोधात आंदोलन करतात. राज्याचे मुख्यमंत्री आणि नितेश राणे यांच्यासारख्या मंत्र्यांना राज्यघटनेच्या आधारे मंत्री पदाची शपथ दिलेली आहे. राज्य घटनेच्या आधारे चालावे याची राज्यघटनेचे संरक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपण राणेंसारख्या मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
नागपूर शहरात रामनवमी व ताजुद्दीन बाबाचा उरुसामध्ये दोन्ही धर्माचे लोक उत्साहाने सहभागी होतात. नागपूर शहराने आजपर्यंत सामाजिक सौहार्द टिकवण्याचे काम करून एक आदर्श घालून दिला आहे, याच नागपूर शहरात धार्मिक मुद्द्यावर हिंसाचाराची घटना घडावी हे अत्यंत चिंताजनक व निषेधार्ह आहे, असेही शिष्टमंडळाने म्हटले आहे.
Related
Articles
आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश
12 Apr 2025
खैबरमध्ये गोळीबारात दोन दहशतवादी ठार
12 Apr 2025
पाणी बचतीत लोकसहभाग महत्त्वाचा
12 Apr 2025
इथेनॉल उत्पादनाच्या प्रगत तंत्रज्ञान वापराने साखर कारखान्यांच्या नफ्यात मोठी वाढ शक्य
07 Apr 2025
हुजूरपागा शाळेत आता परकीय भाषा व संस्कृतचे वर्ग
09 Apr 2025
उधमपूरमध्ये चकमक; तीन दहशतवाद्यांना घेरले
10 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात आठवडाभर पावसाचा अंदाज
2
तनिषा भिसे प्रकरणात मंगेशकर रूग्णालय दोषी
3
ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिका रस्त्यावर
4
काश्मीरमध्ये सत्तेचा वाद (अग्रलेख)
5
रामनवमी सोहळ्यासाठी मंदिरे सज्ज
6
एक शाप, दोन वर