E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुढी पाडव्याला हापूस विसरा
Samruddhi Dhayagude
27 Mar 2025
३० ते ४० टक्क्यांनी आवक घटली; दर आवाक्याबाहेर
पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढी पाडवा आणि आंबा हे समीकरणच आहे. त्यामुळे या दिवशी आवर्जून हापूस आंब्याचा आस्वाद घेतला जातो. मात्र, यंदा बदलत्या हवामानाचा मोठा फटका हापूसला बसला आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांनी आवक घटली आहे. त्यामुळे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे या पाडव्याला हापूस विसरावाच लागणार आहे. मागील वर्षी ५०० ते ७०० रुपये डझन भाव मिळणार्या आंब्याला आता १००० ते १८०० रुपये मोजावे लागत आहेत.
कोकणातून मागील वर्षी पाडव्याच्या वेळी पाच ते सहा हजार पेटींची आवक दररोज होत होती. ती आता एक ते दोन हजार पेट्यापर्यंत कमी होत आहे. लांबलेला पाऊस, कमी पडलेली थंडी आणि आता वाढलेल्या तपमानामुळे आंब्याचा पहिला मोहोर गळाला आहे. परिणामी, उत्पादन घटल्याने आवक कमी होत आहे. त्यातच पाडव्यामुळे पुढील चार ते पाच दिवस मागणी जास्त असणार आहे. त्यामुळे भाव चढेच राहण्याचा अंदाज व्यापारी युवराज काची आणि अरविंद मोरे यांनी वर्तविला आहे. सध्या बाजारात कच्चा मालाच्या चार ते सहा डझनाच्या पेटीला दर्जानुसार तीन ते पाच हजार रुपये आणि पाच ते आठ डझनाच्या पेटीला दर्जानुसार चार ते आठ हजार रुपये भाव मिळत आहे.
दरवर्षी पाडव्याच्या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून हापूसची खरेदी केली जाते. यंदाही मागणी असणार आहे. मात्र दर खूपच अधिक असल्याने सर्वसामान्यांना आंबा खरेदी करण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण, मागच्या वर्षी जो पेटीचा दर होता. तो या वर्षी डझनाचा आहे. त्यामुळे हापूस खरेदी करण्याआधी चार वेळा विचार करावा लागणार आहे. हे दर अधिक काळ टिकून राहतील. असा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत.
दर अधिक राहतील
सध्या आंब्याची कमी आवक होत आहे. १० एप्रिल ते १० मे या कालावधीत आवक वाढणार आहे. त्यावेळी भावात घट होण्याची शक्यता आहे. दरवर्षी ३० जूनपर्यंत हंगाम असतो. मात्र, तो यंदा १ महिना आधीच संपण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत दर अधिक राहतील.
- युवराच काची, व्यापारी, मार्केटयार्ड
Related
Articles
वाहनांच्या पसंती क्रमाकांतून आरटीओला ५९ कोटींचा महसूल
04 Apr 2025
नोकरीचे आमिष दाखवून फसवणार्यास अटक
06 Apr 2025
जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ कायम
09 Apr 2025
पुण्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस
04 Apr 2025
सर्व पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस पाटील भवन उभारणार
06 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 Apr 2025
वाहनांच्या पसंती क्रमाकांतून आरटीओला ५९ कोटींचा महसूल
04 Apr 2025
नोकरीचे आमिष दाखवून फसवणार्यास अटक
06 Apr 2025
जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ कायम
09 Apr 2025
पुण्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस
04 Apr 2025
सर्व पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस पाटील भवन उभारणार
06 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 Apr 2025
वाहनांच्या पसंती क्रमाकांतून आरटीओला ५९ कोटींचा महसूल
04 Apr 2025
नोकरीचे आमिष दाखवून फसवणार्यास अटक
06 Apr 2025
जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ कायम
09 Apr 2025
पुण्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस
04 Apr 2025
सर्व पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस पाटील भवन उभारणार
06 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 Apr 2025
वाहनांच्या पसंती क्रमाकांतून आरटीओला ५९ कोटींचा महसूल
04 Apr 2025
नोकरीचे आमिष दाखवून फसवणार्यास अटक
06 Apr 2025
जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ कायम
09 Apr 2025
पुण्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस
04 Apr 2025
सर्व पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस पाटील भवन उभारणार
06 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
मतांसाठी ‘सौगात’
5
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
6
मूळ पुणेकरांचा कानोसा आणि पुणे वाचवा चळवळ !