E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जनसंवाद सभेमुळे नागरिक व प्रशासनातील संवाद वाढेल
Wrutuja pandharpure
26 Mar 2025
अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांचे प्रतिपादन
पिंपरी
, : ’पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील नागरिक व प्रशासन यांच्यातील सुसंवाद वृद्धिगत होण्यासाठी या जनसंवाद सभा उपयुक्त ठरत आहेत,’ असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ’ग’ क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी जनसंवाद सभा अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिकेचे उप आयुक्त तथा जनसंवाद समन्वयक मनोज लोणकर, ग क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर, कार्यकारी अभियंता झहिरा मोमीन उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ८ क्षेत्रीय कार्यालयात देखील जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अ,ब, क, ड, इ, फ, ह, क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे १४, १२, ४, १५, ५, १२, १९ तक्रारी नागरिकांनी सादर केल्या होत्या. तर ’ग’ क्षेत्रीय कार्यालयात पार पडलेल्या या जनसंवाद सभेत नागरिकांनी १४ तक्रारी मांडल्या.जांभळे पाटील यांनी सर्व तक्रारी ऐकून घेत त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या. तसेच क्षेत्रीय कार्यालयांच्या कामांची अधिकार्यांकडून माहिती देखील घेतली.
शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा घेतला आढावा
नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार महानगरपालिका प्रशासनाने शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम आखला आहे. यामध्ये महानगरपालिकेचे संकेतस्थळ सुसज्ज करणे, मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवून अनावश्यक गोष्टी काढून टाकणे, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण, पालिका क्षेत्रात उद्योग सुरू करू इच्छिणार्या उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करणे, त्यांच्यासाठी आखण्यात आलेल्या धोरणांची अंमलबजावणी करणे, अशा बाबींवर भर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने देखील अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील प्रत्येक विभागाची पाहणी केली. यावेळी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, बैठक व्यवस्था, प्रत्येक विभागाच्या नावाच्या पाट्या आदी कामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना जांभळे पाटील यांनी दिल्या.
Related
Articles
उसेन बोल्टच्या वडिलांचे निधन
03 Apr 2025
गुजरातचा ८ फलंदाज राखून विजय
03 Apr 2025
नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत पडून सात महिला शेतमजुरांचा मृत्यू
05 Apr 2025
औंध बसस्थानकाचे उद्घाटन
03 Apr 2025
रत्नागिरीत १३ बांगलादेशींना सहा महिन्यांची कैद
05 Apr 2025
नव्या आर्थिक वर्षातील बदलाचा मागोवा
04 Apr 2025
उसेन बोल्टच्या वडिलांचे निधन
03 Apr 2025
गुजरातचा ८ फलंदाज राखून विजय
03 Apr 2025
नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत पडून सात महिला शेतमजुरांचा मृत्यू
05 Apr 2025
औंध बसस्थानकाचे उद्घाटन
03 Apr 2025
रत्नागिरीत १३ बांगलादेशींना सहा महिन्यांची कैद
05 Apr 2025
नव्या आर्थिक वर्षातील बदलाचा मागोवा
04 Apr 2025
उसेन बोल्टच्या वडिलांचे निधन
03 Apr 2025
गुजरातचा ८ फलंदाज राखून विजय
03 Apr 2025
नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत पडून सात महिला शेतमजुरांचा मृत्यू
05 Apr 2025
औंध बसस्थानकाचे उद्घाटन
03 Apr 2025
रत्नागिरीत १३ बांगलादेशींना सहा महिन्यांची कैद
05 Apr 2025
नव्या आर्थिक वर्षातील बदलाचा मागोवा
04 Apr 2025
उसेन बोल्टच्या वडिलांचे निधन
03 Apr 2025
गुजरातचा ८ फलंदाज राखून विजय
03 Apr 2025
नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत पडून सात महिला शेतमजुरांचा मृत्यू
05 Apr 2025
औंध बसस्थानकाचे उद्घाटन
03 Apr 2025
रत्नागिरीत १३ बांगलादेशींना सहा महिन्यांची कैद
05 Apr 2025
नव्या आर्थिक वर्षातील बदलाचा मागोवा
04 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
3
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
4
मलेशियातील आगीत १०० जखमी
5
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
6
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक