E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात निलंबित
Samruddhi Dhayagude
26 Mar 2025
मुंबई, (प्रतिनिधी) : बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यावर कोरोना काळातील अनियमितताबाबत ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करून तीन महिन्यांत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंगळवारी विधानसभेत केली. भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात डॉ. अशोक थोरात यांचे नाव चर्चेत आले होते. देशमुख यांचा शिवविच्छेदनाचा अहवाल थोरात यांनी दिला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
काल विधानसभेत आमदार नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी मांडत म्हणाल्या की, बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात यांनी कोरोना काळात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. कोट्यवधीचा भ्रष्टाचार बीडमध्ये झाला आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी झाली. यात ते दोषी सापडले होते. त्यांची बदली नाशिकला करण्यात आली. मात्र, नंतर त्यांनी काय केले हे माहीत नाही. पण, त्यानंतर परत जिथे भ्रष्टाचार झाला तिथे बीडमध्ये त्यांची सिव्हिल सर्जन म्हणून बदली करण्यात आली. हे बरोबर आहे का? जिथे इतका मोठा प्रचंड भ्रष्टाचार झाला, त्यांना पुन्हा इकडे परत कसे आणले गेले? या व्यक्तीवरती तुम्ही गुन्हा दाखल करणार का? त्यांचे तुम्ही निलंबन करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या कामकाजाबद्दल खूप गंभीर आक्षेप आहेत. त्यामुळे अशोक थोरात यांना तत्काळ निलंबित करून तीन महिन्यांच्या कालावधीत चौकशी पूर्ण करण्यात येईल. यात जे-जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा आबिटकर यांनी केली.
Related
Articles
दीनानाथ रुग्णालयास महापालिकेची जप्तीची नोटीस
09 Apr 2025
आरबीआय कडून रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्सने कपात!
09 Apr 2025
आईने जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवले
09 Apr 2025
सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश संपत्ती जाहीर करणार
04 Apr 2025
प्रशांत कोरटकर याला जामीन मंजूर!
09 Apr 2025
मूळ पुणेकरांचा कानोसा आणि पुणे वाचवा चळवळ !
03 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
मतांसाठी ‘सौगात’
5
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
6
मूळ पुणेकरांचा कानोसा आणि पुणे वाचवा चळवळ !