E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
एकदम फील गुड आठवडा
Wrutuja pandharpure
24 Mar 2025
धनंजय दीक्षित
तुम्ही जर इतक्यात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाने प्रवास केला असेल, तर प्रवासाला यातायात का म्हणतात हे लगेच लक्षात येते; परंतु यामध्ये सुद्धा पुण्याहून जाताना कराडमध्ये प्रवेश करण्याआधी काही किलोमीटरचा भाग हा इतका मस्त आहे की, आधीचे बरेचसे खड्डे आपण विसरूनच जातो. बाजारातील गेला आठवडा हा असाच होता... साधारणतः सप्टेंबरच्या अखेरीस बाजाराला जी उतरती कळा लागली, ती या आठवड्यामध्ये विसरून जावी इतकी जोरदार मुसंडी बाजाराने मारली, जी गेल्या ४ वर्षांमधील सर्वात मोठी साप्ताहिक वाढ होती. यातदेखील सगळ्यात अग्रेसर जे शेअर होते, ते सगळे स्मॉल कॅप शेअरच होते.... म्हणजे गेले कित्येक महिने, सेबीपासून अगदी खुद्द स्मालकॅप फंड मॅनेजरदेखील ज्यावर आगपाखड करीत होते, तेच घातक शेअर या तेजीमध्ये विनर ठरले असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही. (त्यांची एवढी मोठी खरेदी होण्यात म्युच्युअल फंडांचाही हातभार असणारच, नाही का?)
या मुसंडीमागचे कारणच शोधायचे झाले, तर एक म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीला डॉलर - रुपयातील विनिमय दर हा १ डॉलर = ८६.४४ रुपये होता, तो शुक्रवारी शेअरबाजार बंद होईपर्यंत १ डॉलर = ८५.९८ रुपये एवढा सुधारला. या वाढीमुळेच की काय माहीत नाही; परंतु परदेशी वित्तसंस्थांनी मंगळवारी व बुधवारी शेअर विक्रीपेक्षा खरेदी जास्त केली. या दोन्हीचा परिणाम म्हणून मंदीवाल्यांनी आपले मंदीचे सौदे आवरते घेतले असण्याची शक्यता आहे. म्हणजेच खालच्या भावात त्यांच्याकडून सुद्धा खरेदीला पाठबळ मिळाले असणार. नेहमीप्रमाणे टी.व्ही.वरील सर्व व्यावसायिक वाहिन्यांवर तेजीचे पुरस्कर्ते विश्लेषक दिसू लागले. शेअर बाजाराने नुकताच गाठलेला तळ हा इतक्यात तरी पुन्हा कसा दिसणार नाही व त्यामागील कारणे काय आहेत यावर चर्चा होऊ लागल्या. एकूण आनंदी आनंद!
पुढील आठवड्यामध्ये फ्युचर आणि ऑप्शनची साप्ताहिक, मासिक व वार्षिक व्यवहारपूर्ती गुरुवारी होणार आहे. त्यामुळे बाजारात बर्यापैकी अस्थिरता असू शकते. त्यातून एप्रिल २ या तारखेपासून अमेरिका, प्रत्येक देशावर जशास तसे तत्वावर टॅरिफ लावण्यास सुरुवात करणार आहे, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. जोपर्यंत (त्यांच्या आतापर्यंतच्या सवयीनुसार) ही घोषणा ते रद्द करीत नाहीत, तोपर्यंत बाजारावर, विशेषतः तेजीवाल्यांवर, ती एक टांगती तलवारच असणार आहे. त्यामुळे १७-२४ मार्चमध्ये झालेली तेजी किती टिकून राहील हे सांगणे म्हणजे कराडपर्यंत लागलेला चांगला रस्ता तसाच पुढे किती दूरपर्यंत असेल हे सांगण्याइतकेच कठीण आहे. (सद्य परिस्थितीत, एक वेळ तेजी टिकून राहील परंतु....)
(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)
Related
Articles
सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
03 Apr 2025
रत्नागिरीत १३ बांगलादेशींना सहा महिन्यांची कैद
05 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
महामार्गावरील टोल दरात वाढ
02 Apr 2025
महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये बसवणार युव्ही फिल्टर यंत्रणा
01 Apr 2025
उठाठेवी करणारा उचापती!
31 Mar 2025
सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
03 Apr 2025
रत्नागिरीत १३ बांगलादेशींना सहा महिन्यांची कैद
05 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
महामार्गावरील टोल दरात वाढ
02 Apr 2025
महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये बसवणार युव्ही फिल्टर यंत्रणा
01 Apr 2025
उठाठेवी करणारा उचापती!
31 Mar 2025
सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
03 Apr 2025
रत्नागिरीत १३ बांगलादेशींना सहा महिन्यांची कैद
05 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
महामार्गावरील टोल दरात वाढ
02 Apr 2025
महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये बसवणार युव्ही फिल्टर यंत्रणा
01 Apr 2025
उठाठेवी करणारा उचापती!
31 Mar 2025
सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
03 Apr 2025
रत्नागिरीत १३ बांगलादेशींना सहा महिन्यांची कैद
05 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
महामार्गावरील टोल दरात वाढ
02 Apr 2025
महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये बसवणार युव्ही फिल्टर यंत्रणा
01 Apr 2025
उठाठेवी करणारा उचापती!
31 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
नववर्षाचा सृष्टिसंकेत
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
‘गीता रहस्य’- शाश्वत तत्वज्ञानाची गंगोत्री