न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?   

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार करु, असे आश्वासन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी गुरुवारी दिले.वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करू नका, या मागणीसाठी वकील संघटनांनी मंगळवारी जोरदार निदर्शने केली होती. तसेच, बार असोशिएशने नाराजी व्यक्त केली होती.दरम्यान, सरन्यायाधीश खन्ना यांनी बार असोसिएशनच्या अध्यक्षांची भेट घेतली. या भेटीत वर्मा यांच्या बदलीच्या शिफारशीबाबत फेरविचार करू, असे खन्ना यांनी सांगितले. 
 
१४ मार्च रोजी रात्री साडे-अकराच्या सुमारास वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागली होती. त्यावेळी वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात नोटा आढळल्या होत्या. त्यापैकी काही नोटा जळाल्या होत्या. या घटनेनंतर, सरन्यायाधीशांनी वर्मा यांच्या विभागीय चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती स्थापन केली. या समितीमध्ये पंजाब आणि हरयाना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी.एस. संधावालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अनु शिवरामन यांचा समावेश आहे. या समितीने वर्मा यांच्या निवासस्थानाची नुकतीच पाहणी केली होती. दिल्ली पोलिसांनीदेखील घराची कसून तपासणी केली होती.

Related Articles