E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पंत सर्वात महागडा तर रहाणे सर्वात स्वस्त कर्णधार
Samruddhi Dhayagude
22 Mar 2025
कोलकाता : आयपीएलच्या १८ व्या हंगामाला आजपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या दृष्टीने सर्व १० संघानी तयारी सुरु केली आहे. खेळाडू आपआपल्या संघाशी जोडले जात असून सराव सुरु करण्यात आला आहे. या हंगामातील पहिला सामना २२ मार्च रोजी कोलकातामधील ईडन गार्डनवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात केकेआर आणि आरसीबी दरम्यान असणार आहे. दरम्यान, आता आयपीएलमधील सर्व १० संघांच्या कर्णधारांची घोषणा करण्यात आली आहे.
या हंगमात पाच संघांना नवे कर्णधार मिळाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलवर कर्णधारपदाची धुरा सोपवली. केकेआरने अजिंक्य राहणेच्या नेतृत्वावर विश्वास टाकला. याशिवाय आरसीबीने रजत पाटीलकडे कर्णधारपद दिले आहे. पंजाबने श्रेयस अय्यर तर लखनऊ ऋषभ पंतला कर्णधार म्हणून निवडले.
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात अनेक संघांना नव्या कर्णधाराची गरज होती. कारण त्यांनी आपल्या जुन्या कर्णधारांना रिलीज केले होते. त्यामुळे नवे कर्णधार मिळवण्यासाठी संघांना मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्यामुळे प्रत्येक कर्णधाराची सॅलरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ऋषभ पंत आयपीएल २०२५ मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
मेगा लिलावात लखनऊने त्याला २७ कोटी रुपयांना खरेदी केले. पंजाबलाही नवीन कर्णधाराची गरज होती, त्यामुळे त्यांनी श्रेयस अय्यरला २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. या मोसमात अजिंक्य रहाणे सर्वात स्वस्त कर्णधार ठरला आहे. कारण केकेआरने त्याला दीड कोटी रुपयांना विकत घेतले.या कर्णधारांच्या यादीत पॅट कमिंस तिसर्या क्रमांकावर आहे. पॅट कमिन्सला २०२५ च्या हंगामासाठी सनरायझर्स हैदराबादने १८ कोटींमध्ये कायम ठेवले आहे. कमिन्सच्या नेतृत्वाखाली संघाने गेल्या मोसमात अंतिम फेरी गाठली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि एमएस धोनी आता कर्णधार म्हणून दिसणार नाहीत. मात्र, ते संघात मार्गदर्शन करत चांगली खेळी करताना दिसतील, असे बोलले जाते.
आयपीएलमधील १० कर्णधारांचे मानधन
ऋषभ पंत : २७ कोटी
श्रेयस अय्यर - २६.७५ कोटी
पैट कमिंस - १८ कोटी
ऋतुराज गायकवाड- १८ कोटी
संजू सैमसन - १८ कोटी
अक्षर पटेल - १६.५ कोटी
शुभमन गिल - १६.५ कोटी
हार्दिक पांड्या - १६.३५ कोटी
रजत पाटीदार - ११ कोटी
अजिंक्य रहाणे - १.५ कोटी
Related
Articles
सरकारी तिजोरीत प्राप्तिकराचा मोठा भरणा
28 Mar 2025
क्रिकेट सामना आणि विवाह
31 Mar 2025
अमेरिकेत आयात होणार्या मोटारींवर २५ टक्के कर
28 Mar 2025
पुतीन यांच्या ताफ्यातील मोटारीत स्फोट
31 Mar 2025
पुणे, पिंपरी- चिंचवडमधील ७९ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य!
26 Mar 2025
डॉ. केशवराव हेडगेवार : द्रष्टा महापुरुष
30 Mar 2025
सरकारी तिजोरीत प्राप्तिकराचा मोठा भरणा
28 Mar 2025
क्रिकेट सामना आणि विवाह
31 Mar 2025
अमेरिकेत आयात होणार्या मोटारींवर २५ टक्के कर
28 Mar 2025
पुतीन यांच्या ताफ्यातील मोटारीत स्फोट
31 Mar 2025
पुणे, पिंपरी- चिंचवडमधील ७९ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य!
26 Mar 2025
डॉ. केशवराव हेडगेवार : द्रष्टा महापुरुष
30 Mar 2025
सरकारी तिजोरीत प्राप्तिकराचा मोठा भरणा
28 Mar 2025
क्रिकेट सामना आणि विवाह
31 Mar 2025
अमेरिकेत आयात होणार्या मोटारींवर २५ टक्के कर
28 Mar 2025
पुतीन यांच्या ताफ्यातील मोटारीत स्फोट
31 Mar 2025
पुणे, पिंपरी- चिंचवडमधील ७९ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य!
26 Mar 2025
डॉ. केशवराव हेडगेवार : द्रष्टा महापुरुष
30 Mar 2025
सरकारी तिजोरीत प्राप्तिकराचा मोठा भरणा
28 Mar 2025
क्रिकेट सामना आणि विवाह
31 Mar 2025
अमेरिकेत आयात होणार्या मोटारींवर २५ टक्के कर
28 Mar 2025
पुतीन यांच्या ताफ्यातील मोटारीत स्फोट
31 Mar 2025
पुणे, पिंपरी- चिंचवडमधील ७९ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य!
26 Mar 2025
डॉ. केशवराव हेडगेवार : द्रष्टा महापुरुष
30 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बीजिंग-वॉशिंग्टनने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग निवडावा
2
खासदारांना भरघोस पगारवाढ
3
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
4
‘फिरकी’ने पटकावला पहिला लोकमान्य करंडक
5
एकाच माळेचे मणी (अग्रलेख)
6
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)