E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
दत्ता गाडे यांच्या वकिलांच्या सहाय्यकाचे अपहरण
Samruddhi Dhayagude
19 Mar 2025
बोपदेव घाटात मारहाण करुन दिवे घाटात सोडले
पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलाकडे नोकरी करणार्या एका सहाय्यक वकिलाचे सोमवारी अनोळखी व्यक्तींनी अपहरण केले. बोपदेव घाटात नेऊन त्यांना बेदम मारहाण केली. यात वकिल गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी अपहरणकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. अपहरण व मारहाणीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
साहिल डोंगरे, असे मारहाण झालेल्या सहाय्यक वकिलाचे नाव आहे. दत्तात्रय गाडे याचे वकील वाजिद खान बिडकर यांच्याकडे डोंगरे हे सहाय्यक वकील म्हणून काम करतात. डोंगरे यांचे सायंकाळी हडपसर परिसरातून काही व्यक्तींनी मोटारीतून अपहरण केले. नंतर त्यांना बोपदेव घाटात नेण्यात आले. तिथे डोंगरे यांना बेदम मारहाण करून अपहरणकर्त्यांनी त्यांना दिवे घाटात सोडून दिले. मारहाण झाल्यानंतर डोंगरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सध्या वकील डोंगरे यांच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान, डोंगरे यांचे अपहरण कोणी केले? त्यांना मारहाण कोणी आणि का केली? स्वारगेट अत्याचार प्रकरणाशी याचा काही संबंध आहे का? या अनुषंगाने हडपसर पोलिसांकडून तपास केला जात आहे. वकील वाजिद खान बिडकर यांनी या प्रकरणाचा निषेध केला आहे.
वकील बिडकरकडून चित्रफित प्रसारित
गाडेचा वकिल वाजिद खान बिडकर यांनी साहिल डोंगरे यांच्या अपहरणाची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित केली आहे. या चित्रफितमध्ये डोंगरे यांनी स्वत:चे अपहरण आणि मारहाणीचा प्रसंग सांगितला आहे. एका गुन्ह्याच्या केसमध्ये मी हडपसर पोलीस ठाण्यात गेलो होतो. तिथे मला एक ग्राहक भेटायला आला. त्यांनी मला ५४ हजार रूपये दिले. त्यानंतर काम आटोपून घरी निघालो असता माझ्या दुचाकीतील पेट्रोल संपले. त्यामुळे मी जवळच्या पेट्रोलपंपावर गेलो. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका व्यक्तींनी मदत मागितली. मदतीच्या बहाण्याने मोटारीतील काही व्यक्तींनी माझे अपहरण केले. बोपदेव गाटात नेऊन मारहाण केली. नंतर मला दिवे घाटात सोडून ते पळून गेले. त्यानंतर मी जखमी अवस्थेतच स्वत:ला सावरत पोलीस ठाण्यात आलो.
Related
Articles
मोटारकार चालकाने दुचाकीवरील दोघांना नेले फरफटत
01 Apr 2025
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या विमानाचा अपघात
31 Mar 2025
म्यानमारला आणखी महिनाभर बसणार भूकंपाचे धक्के
01 Apr 2025
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
03 Apr 2025
वैकुंठ स्मशानभूमीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यास यश
05 Apr 2025
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक
02 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
नववर्षाचा सृष्टिसंकेत
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले