E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
कल्याणीनगर अपघात प्रकरणाची सुनावणी लवकरच
Samruddhi Dhayagude
19 Mar 2025
अतिरिक्त पोलीस आयुक्तांची माहिती
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याप्रकरणात अग्रवाल दाम्पत्यांसह अन्य आरोपींविरूध्द पुणे पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावाणी न्यायालयात लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेंद्र बलकवडे यांनी दिली.
या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून शिशिर हिरे काम पाहत आहेत. या प्रकरणात एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत. कल्याणीनगर भागात पबमध्ये मित्रांसह मद्य प्राशन करून भरधाव वेगात पोर्श मोटार चालवून आयटी अभियंता असलेल्या दोघांचा बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने बळी घेतला होता. आरोपी मुलाच्या अटकेनंतर दाखल गुन्ह्याचे कामकाज बाल न्याय मंडळाकडून पाहण्यात येत आहे.
मुलाला वाचविण्यासाठी वडील विशाल अग्रवाल, त्याची पत्नी शिवानी यांनी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्याशी संगनमत करुन त्याच्या रक्ताचे नमुने बदलले होते. त्यानंतर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सध्या अग्रवाल दाम्पत्य, डॉ. तावरे, डॉ. हाळनोर, तसेच अन्य आरोपी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत शिक्षा भोगत आहेत. आरोपी मुलाला वाचविण्यासाठी त्याचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि वडील विशाल यांनी मोटारचालकगंगाधर हेरीक्रुब यांना धमकावले होते. अपघाताच्या वेळी मुलगा मोटार चालवत नव्हता. तसेच, मुलाने मद्यप्राशन सुध्दा केले नव्हते. हेरीक्रुब यांना धमकावून अग्रवाल यांनी वडगाव शेरीतील बंगल्यात त्यांना डांबून ठेवले होते. त्यानंतर हेरीक्रुब यांचे अपहरण करून धमकावल्याप्रकरणी अग्रवाल दाम्पत्यांवर आणखी एक गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
विशेष सरकारी वकील म्हणून महत्वाची कामगिरी
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वला पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बोपदेव घाट प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी पवार यांनी महत्त्वाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे.
Related
Articles
समाजकंटकांपासून दूर राहा
03 Apr 2025
तंदुरुस्ती चाचणीच्या सकारात्मक अहवालानंतर जसप्रीत बुमरा मुंबईच्या संघात परतणार
05 Apr 2025
एटीएजीएस तोफांना मोठी मागणी : बाबा कल्याणी
04 Apr 2025
प्रार्थनास्थळ कायद्यासंदर्भात नवे अर्ज स्वीकारणार नाही
02 Apr 2025
छत्तीसगढमध्ये चकमकीत महिला नक्षलवादी ठार
01 Apr 2025
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
नववर्षाचा सृष्टिसंकेत
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले