दिल्लीत बांगलादेशी नागरिकाला अटक   

नवी दिल्ली : दिल्ली शहरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. अफजुद्दीन गाझी (वय ४०) असे या बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे. १३ मार्च रोजी पहाटे पोलिसांच्या गस्तीदरम्यान  या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते. 
   
गाझी याने २०२२ मध्ये बेनापोल-पेट्रापोल सीमेवरून बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश केला होता. गाझी गुरूवारी रेल्वेने दिल्लीला जात होता. कचरा वेचक म्हणून तो काम करत होता. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सुरुवातीला पश्चिम बंगालमधील मालदा येथील रहिवासी असल्याचे सांगितले, मात्र अधिक चौकशीत त्याची खरी ओळख समोर आली. फॉरेनर्स रीजनल रजिस्ट्रेशन कार्यालयाने हद्दपारीची प्रक्रिया सुरू केली असून, गाझीला बांगलादेशात परत जाईपर्यंत शहजादा बागमधील सेवा सदनात ठेवण्यात आले आहे.

Related Articles