E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
युद्धबंदीची तत्त्वे मान्य; शांतता कायमस्वरुपी नांदावी : पुतीन
Samruddhi Dhayagude
14 Mar 2025
एक महिन्याच्या युद्धबंदीला नकार
मॉस्को : युक्रेनसोबत एक महिन्याची युद्धबंदी करण्याचा अमेरिकेच्या प्रस्तावातील तत्वे मान्य आहेत, असे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी सांगितले आहे. तसेच प्रस्तावातील अटी आणि शर्थीवर अधिक काम करुन त्याद्वारे कायमस्वरुपी शांतता निर्माण व्हायला हवी, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. एकंदरीत पुतीन यांनी एक महिन्याच्या युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळल्याचे मानले जात आहे.
एक महिन्याच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत पुतीन म्हणाले, तुमची कल्पना बरोबर आहे आणि आम्ही पाठिंबा देतो. पण, काही मुद्दयावर आम्हला चर्चा करायची आहे. मला असे वाटते त्यावर अमेरिकन सहकारी आणि भागिदार यांच्याशी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. युद्धबंदी करार लागू करण्यासाठी करारातील काही मोकळ्या वाटांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. युद्धबंदीच्या एक महिन्याच्या कालावधीत युक्रेन आपली शक्ती आणि शस्त्रास्त्रे गोळा करणार आहे का ? लढाई थांबविण्याचा प्रस्ताव रशियाला मान्य आहे. पण, तो केवळ ३० दिवसांपुरता मर्यादित नको. युद्धास कारणीभूत ठरणारे मूळ नष्ट करुन शांतता कायमस्वरुपी नांदली पाहिजे.
युद्धबंदी स्वीकारावी, यासाठी अमेरिकेने युक्रेनचे मन वळविले आहे. युद्धानंतरच्या परिस्थिती पाहता लढाई बंद होणे युक्रेनच्या हिताचे ठरणार आहे. युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या क्रूक्स परिसरात हल्ला केला. आता तेथे युक्रेनचे सैन्य अडकले आहे. त्याची या परिसरात पूर्णत: कोंडी झाली आहे. त्यामुळे ३० दिवसांची युद्धबंदी युक्रेनच्या पथ्यावर पडणारी आहे. तेथील सैनिकांना लढल्याशिवाय माघार घेता येणार नाही, असे पुतीन यांनी सांगितले.
मोदींसह अनेक नेत्यांचे आभार
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धबंदी व्हावी, यासाठी प्रयत्न करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीन, ब्राझील आणि दक्षिण अफ्रिकेच्या नेत्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. युद्धबंदीसाठी वरील देशांची नेतेमंडळी अधिक मोलाची भर टाकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच नाटोच्या कोणत्याही सदस्याला युद्धबंदींनंतरच्या शांतता कार्यात पाहणीं करण्याची अनुमती रशिया देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
Related
Articles
पाकिस्तानच्या मदतीने बांगलादेशात बंडाचे कारस्थान?
12 Mar 2025
वक्फ विधेयक, मतदान ओळखपत्रावरुन संसदेत वादळी चर्चा शक्य
10 Mar 2025
अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक
11 Mar 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरीशसमध्ये जंगी स्वागत
12 Mar 2025
उत्तर प्रदेशात आठ वर्षांत २१० कोटी झाडे लावली
15 Mar 2025
पाकिस्तानच्या लष्करी तळावर आत्मघातकी हल्ला

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
4
भारतचं चॅम्पियन
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)