E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य
Samruddhi Dhayagude
14 Mar 2025
पुणे : काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सह्याद्री फार्म कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्म चे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, पिताश्री वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.
द्राक्षाच्या हंगामात अशा पद्धतीची आरास मंदिरात गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. आज सह्याद्री फार्म ला २२,००० शेतकरी जोडले गेले आहेत. भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यात करणारी कंपनी म्हणून म्हणून सह्याद्रीची ओळख आहे. यावेळी सुनील रासने म्हणाले, प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो. द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्टया उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरुपी वाटप केले जाईल.
Related
Articles
तुषार गांधींविरोधात घोषणा; पाच जणांवर गुन्हा
15 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
12 Mar 2025
महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा फेरविचार करा; आयुक्तांकडे मागणी
11 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
10 Mar 2025
रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत
11 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
तुषार गांधींविरोधात घोषणा; पाच जणांवर गुन्हा
15 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
12 Mar 2025
महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा फेरविचार करा; आयुक्तांकडे मागणी
11 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
10 Mar 2025
रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत
11 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
तुषार गांधींविरोधात घोषणा; पाच जणांवर गुन्हा
15 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
12 Mar 2025
महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा फेरविचार करा; आयुक्तांकडे मागणी
11 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
10 Mar 2025
रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत
11 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
तुषार गांधींविरोधात घोषणा; पाच जणांवर गुन्हा
15 Mar 2025
फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर
12 Mar 2025
महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा फेरविचार करा; आयुक्तांकडे मागणी
11 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
10 Mar 2025
रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत
11 Mar 2025
मुंबईत खासगी विकासकांची मुजोरी
12 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)