पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून खोटे हिंदुत्व आयात : ममता   

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये राज्यातील नेत्यांकडून खोटे हिंदुत्व आयात केले जात आहे., अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी  केली. 
राज्यात भाजपची सत्ता आल्यास तृणमूल काँग्रेसच्या मुस्लिम धर्मीय  खासदारांना विधानसभेतून बाहेर फेकून दिले जाईल, असे वक्तव्य भाजपचे नेेते सुवेंदू अधिकारी यांनी केले होते. त्या वक्तव्याचा समाचार ममता बॅनर्जी यांनी काल घेतला. त्या म्हणाल्या, भाजपची नेते मंडळी नागरिकांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करत आहेत. तुमचे हिंदुत्व आयात केलेले आहे. जे वेद,  साधू व संत यांच्या हिंदू धर्माशी संबंधित नाही. तुम्ही मुस्लिम धर्मीयांचे हक्क कसे नाकारता ? खोटे हिंदुत्व तुम्ही राज्यात आयात करुन आणले आहे. ती एक प्रकारची फसवणूकच आहे. अल्पसंख्याक समुदायाचा भाजपला आदर नसल्याचे वक्तव्यावरून दिसते. मी हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे. पण, तुमच्या हिदुत्वाच्या आवृत्तीशी मी सहमत नाही. मी हिंदू कार्ड कधीही खेळणार नाही.  
 
अधिकारी यांनी दावा केला होता की, हिंदू धर्मीय मतदारच आता ममता बॅनर्जी यांना निवडणुकीत हिसका दाखवतील आणि तृणमूल काँग्रेसचा पराभव करतील.  त्यावर ममता म्हणाल्या, यांचे वक्तव्य समाजात भेदभाव निर्माण करणारे आहे. 
 

Related Articles