अमेरिकेत मंदीची शक्यता?   

न्यूयॉर्क : अमेरिकेत मंदीची दाट शक्यता आहे. याबाबतचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. यंदा अमेरिकेची अर्थव्यवस्था संक्रमणाच्या काळातून जाईल आणि मंदीची शक्यता नाकारता येत नाही, असे ट्रम्प यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या मंदीची शक्यता नाकारता येत नसल्याच्या विधानाचा आणि  आयात शुल्क बाबत त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद अमेरिकेच्या शेअर बाजारात उमटले. अमेरिकेचा एस अँड पी ५०० निर्देशांक ३.२ टक्क्यांनी घसरला. डाऊ जोन्स १,०४२ अंकांनी कोसळला. 
 
तर, नॅस्डॅक निर्देशांक ४ टक्क्यांनी घसरला. त्यामुळे गुंतवणुकदारांना ७५० अब्ज अमेरिकन डॉलर्स फटका बसला आहे. डाऊ जोन्स २.४२ टक्के म्हणजे १,०४२ अंकांनी कोसळून ४१,९११.७१ वर बंद झाला. तर, एस अँड पी ५०० हा १५५.६४ अंकांनी घसरून ५,६१४.५६ वर बंद झाला. विशेष म्हणजे, एसपी ५०० ने फेब्रुवारी महिन्यात विक्रमी वाटचाल केली होती. डाऊ जोन्स आणि एसपी ५०० ची अलीकडील काळातील मोठी घसरण मानली जात आहे. तर, नॅस्डॅकने सप्टेंबर २०२२ नंतरची मोठी घसरण नोंदवली आहे.अमेरिकेने २०२५ च्या अखेरीस विकास दरवाढीचा अंदाज २.२ टक्क्यांवरुन १.७ टक्के नोंदविला आहे. ट्रम्प यांनी कॅनडा, चीन आणि मेक्सिकोवर मोठा कर आकारला आहे. 

Related Articles