तुलसी गब्बार्ड येणार भारत दौर्‍यावर   

वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आणि राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गब्बार्ड लवकरच भारत दौर्‍यावर येणार आहेत. या संदर्भातील माहिती त्यांनी सोमवारी दिली. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी विविध देशांना भेट देण्याचे ठरविले आहे. त्या मध्ये भारतासह प्रशांत महासागरातील देशांचा समावेश आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विविध देशांत शांतता नांदावी, स्वातंत्र्य अबाधित राहावे आणि समृद्धीला चालना मिळाली, अशी भूमिका आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या विविध देशांचा दौरा करत आहेत. त्यामध्ये प्रशांत महासागरातील जपान, थायलंड आणि भारत यांचा समावेश आहे. मायदेशी परत जाताना त्या फ्रान्सचाही धावता दौरा करणार आहेत. दौर्‍यासाठी विमानात चढत असल्याचे एक छायाचित्रही त्यांनी एक्सच्या पोस्टमध्ये टाकले आहे.

Related Articles