फोन पेच्या ग्राहकांची संख्या ६० कोटींवर   

नवी दिल्ली : ऑनलाइन व्यवहरासाठी प्रसिद्ध असलेल्या फोन पेच्या ग्राहकांची संख्या आता ६० कोटींवर झाली आहे. फोन पेचा वापर करणार्‍या नोंदणीकृत ग्राहकांची आकडेवारी कंपनीने मंगळवारी दिली. फोन पे ऑनलाइन व्यवहारातील अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीने दहा वर्षे पूर्ण केली आहेत. ६० कोटींवर नागरिक फोन पेचा वापर करत असल्याची बाब कंपनीच्या प्रगतीचे द्योेतक आहे. 
 
वापर अधिक वाढावा, यासाठी तसे अनुकूल वातावरण तयार करण्यावर भर दिला आहे. कंपनीचा विस्तार अधिक केला जाईल आणि ती नागरिकांच्या पसंतीस पडेल, अशी पावले उचलली जातील, अशी माहिती संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समीर निगम यांनी दिली.  ते म्हणाले, दहा वर्षांत कंपनीने संपत्ती व्यवस्थापन ई कॉमर्स आणि पिन कोड आदी बाबींत सुधारणा केली. २०२३ अखेर १२ अब्ज डॉलर्स एवढे कंपनीचे मूल्य होते. ऑगस्ट २०१६ मध्ये फोन पे डिजिटल अ‍ॅप सुरू केले. मार्च २०२५ अखेर ६० कोटी नागरिकांनी कंपनीची नोंदणी स्वीकारली. ५ कोटींवर व्यापारी कंपनीशी जोडले गेले आहेत.  २०२४ अखेर ५३ कोटीजण फोन पेचा वापर करत होते. महिन्याला सरासरी २० कोटी  सक्रिय  ग्राहक होते. फोन पे द्वारे दिवसाला ३३ कोटी रुपयांची देणी घेणी  होतात. वर्षाचा विचार केला तर उलाढाल १५० लाख कोटींच्या घरात जाते. 

Related Articles