मुंबई-गोवा महामार्गाचे काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करणार   

मुंबई, (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्याबाबत आजवर अनेकांनी शब्द दिला, पण ते पूर्ण झाले नाही. मंगळवारी विधानसभेत त्याची नवीन तारीख मिळाली. महामार्गाच्या कामाला विलंब झाला आहे. पण, आता विविध टप्प्यांवरील कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत. जानेवारी २०२६ पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण झाले असेल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काल विधानसभेत दिले.चिपळूण शहरातील शेखबहादूर चौकात उड्डाणपूलावर गर्डर बसवण्याचे काम सुरु असताना गर्डर व लाँचरसह उड्डाणपूलाचा काही भाग कोसळल्याच्या दुर्घटनेच्या संदर्भात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी  लक्षवेधी सूचना मांडली होती. यावरील चर्चेत भाग घेताना भास्कर जाधव पुढे म्हणाले की, नशीब बलवत्तर म्हणून स्थानिक आमदार शेखर निकम या दुर्घटनेतून बचावले. 

Related Articles