मद्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला   

६० लाखांचा साठा जप्त 

शिरूर, (प्रतिनिधी) : शिरूर बोर्‍हाडे मळा येथे भारत पेट्रोल पंपसमोर गोवा येथील जवळपास साठ लाख रुपयांच्या बनावट मद्याची वाहतूक करणारा टेम्पो शिरूर पोलिसांनी ताब्यात घेतला.१० मार्च रोजी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार आप्पसाहेब कदम व शेखर झाडबुके हे दोघेजण वाहतूक नियमन करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिरूर गावचे हद्दीत बोराडे मळा येथील पुणे अहिल्यानगर लेनवर असणार्‍या भारत पेट्रोल पंपासमोर बनावट मद्य भरून असलेला एक टेम्पो उभा आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना ही बातमी कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमदार आप्पासाहेब कदम, शेखर झाडबुके, निरज पिसाळ यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. चौकशी केली असला टेम्पोत मद्यसाठा आढळून आला. टेम्पो चालक मोहम्मद इम्रान मोहम्मद सलिम शेख, (वय-३७, मुंबई) यास ताब्यात घेण्यात आले. यावेळी ६० लाख  ४८ हजार रूपयाची गोवा बनावटीची मद्य व १५ लाखाचा टेम्पो असा एकूण ७५ लाख ४८ हजार रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

Related Articles