E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारताकडे आशिया चषकाचे यजमानपद
Wrutuja pandharpure
12 Mar 2025
मुंबई
: भारत-पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अलीकडेच २३ फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तानी संघ आमनेसामने आले होते. या रोमांचक सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. सीमा आणि सुरक्षा वादांमुळे हे दोन्ही संघ फक्त आयसीसी आणि एसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर येतात. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये या वर्षी आणखी ३ सामने खेळले जाऊ शकतात.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, यावर्षीच्या आशिया चषकाचे यजमानपद भारताला देण्यात आले असले तरी, भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत श्रीलंका आणि यूएई या शर्यतीत आघाडीवर आहेत. पण, बीसीसीआय अधिकृत यजमान राहील.
शेवटचा आशिया चषक २०२३ मध्ये एकदिवसाच्या विश्वचषकापूर्वी खेळला गेला होता, त्यामुळे त्याचे स्वरूप एकदिवसाचे सामने असे ठेवण्यात आले होते. यावेळी, २०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी होणार्या आशिया चषक २०२५ चे स्वरूप टी-२० असेल. या स्पर्धेत हे सर्व सामने आशिया चषकामध्ये होणार आहेत. २०२५ च्या आशिया कपचे यजमानपद भारताला देण्यात आले असले तरी, भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या राजकीय तणावामुळे, तो तटस्थ देशात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२५ च्या आशिया कपमध्ये एकूण आठ संघ सहभागी होतील. ज्यात श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, यूएई, ओमान, हाँगकाँग, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश असेल. या आठ संघांची दोन गटात विभागणी केली जाईल. दोन्ही गटांमधील अव्वल २ संघ सुपर-४ मध्ये प्रवेश करतील. यानंतर, सुपर-४ मधील दोन संघ अंतिम फेरीत एकमेकांसमोर येतील.
गट सामन्याव्यतिरिक्त, भारत आणि पाकिस्तानी संघ सुपर-४ फेरीत एकमेकांशी भिडू शकतात. याशिवाय, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना शक्य आहे. जर असे झाले तर स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने होऊ शकतात. पण, अद्याप अधिकृतपणे ही माहिती उघड झालेली नाही. आशिया कपचे वेळापत्रक, यजमान, स्वरूप आणि संघ याबद्दलची अधिकृत माहिती लवकरच जाहीर होऊ शकते. परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, श्रीलंकेव्यतिरिक्त, आशिया कप २०२५ चे यजमानपद (यूएई) ला देखील दिले जाऊ शकते
Related
Articles
ब्रिटनच्या अधिकार्यांची हकालपट्टी
11 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
जनतेचा विश्वास असलेले सरकार येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये स्थैर्य अशक्य : इम्रान खान
14 Mar 2025
नाराज नाही; पण, बाहेर बोलायची चोरी!
15 Mar 2025
महिला आणि आर्थिक साक्षरता
10 Mar 2025
मेट्रोच्या दोन मार्गांसाठी प्रस्ताव
11 Mar 2025
ब्रिटनच्या अधिकार्यांची हकालपट्टी
11 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
जनतेचा विश्वास असलेले सरकार येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये स्थैर्य अशक्य : इम्रान खान
14 Mar 2025
नाराज नाही; पण, बाहेर बोलायची चोरी!
15 Mar 2025
महिला आणि आर्थिक साक्षरता
10 Mar 2025
मेट्रोच्या दोन मार्गांसाठी प्रस्ताव
11 Mar 2025
ब्रिटनच्या अधिकार्यांची हकालपट्टी
11 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
जनतेचा विश्वास असलेले सरकार येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये स्थैर्य अशक्य : इम्रान खान
14 Mar 2025
नाराज नाही; पण, बाहेर बोलायची चोरी!
15 Mar 2025
महिला आणि आर्थिक साक्षरता
10 Mar 2025
मेट्रोच्या दोन मार्गांसाठी प्रस्ताव
11 Mar 2025
ब्रिटनच्या अधिकार्यांची हकालपट्टी
11 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
जनतेचा विश्वास असलेले सरकार येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये स्थैर्य अशक्य : इम्रान खान
14 Mar 2025
नाराज नाही; पण, बाहेर बोलायची चोरी!
15 Mar 2025
महिला आणि आर्थिक साक्षरता
10 Mar 2025
मेट्रोच्या दोन मार्गांसाठी प्रस्ताव
11 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
3
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचे भर रस्त्यात अश्लील चाळे
4
येमेनजवळ चार नौका बुडून १८६ जण बेपत्ता
5
युक्रेनच्या वीज प्रकल्पांवर रशियाचे पुन्हा बाँब हल्ले
6
मणिपूरमध्ये एक हजारांवर बेकायदा शस्त्रे जमा