E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Wrutuja pandharpure
12 Mar 2025
रानटी व पाळीव हंस
एका कुंपणात काही हंस पाळले होते. त्यापैकी दोन हंस एके दिवशी कुंपणाच्या फटीतून बाहेर पडले आणि जवळच्या ओढ्यातून पोहत पोहत एका दलदलीच्या जागी जाऊन पोहोचले. तेथे त्यांना भरपूर खाद्य मिळू लागले, म्हणून त्यांनी तिथेच कायमचे राहायचे ठरवले. जवळच्या रानटी हंसांचा एक मोठा कळप तेथे नेहमी येत असे.
सुरुवातीला, रानटी हंसांना या पाळीव हंसांशी मैत्री करायला थोडा संकोच वाटला; पण हळूहळू त्यांची चांगली ओळख झाली आणि ते त्यांच्याशी अगदी मोकळेपणाने वागू लागले. एके दिवशी, हंसांचा आवाज ऐकून एक कोल्हा लपतछपत तिथे आला आणि त्यांच्यावर झडप घालणार होता; पण त्याची चाहूल लागताच सगळे रानटी हंस मोठ्याने ओरडत आकाशात उडून गेले.
ते दोन्ही पाळीव हंस मात्र तिथेच राहिले. गावात असताना त्यांचा मालक त्यांचे रक्षण करायचा, त्यामुळे त्यांना उडायची किंवा स्वतःचे रक्षण करायची सवय नव्हती. त्यामुळे ते दोन्ही हंस त्या कोल्ह्याची शिकार झाले.
तात्पर्य : जिथे आपले रक्षण करण्याची क्षमता आपल्यात नाही, तिथे जाऊन राहणे मूर्खपणाचे आहे.
-------
अपेक्षाभंग दुःख देतो, म्हणून शांत आणि समाधानी जीवनासाठी कोणाकडूनही अपेक्षा न ठेवणे महत्त्वाचे आहे. यामुळे दुःख कमी होते, मन शांत राहते, स्वतंत्र विचार करता येतो, जीवन आनंदी होते आणि संबंध सुधारतात. यासाठी स्वतःवर लक्ष केंद्रित करणे, वर्तमानकाळात जगणे, इतरांना जसे आहेत तसे स्वीकारणे, कृतज्ञ राहणे आणि सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा की अपेक्षा पूर्णपणे टाळणे शक्य नसले तरी त्या कमी करणे शक्य आहे, स्वतःकडून वास्तववादी अपेक्षा ठेवा आणि अपेक्षा न ठेवणे म्हणजे प्रेम न करणे नव्हे. अपेक्षा न ठेवता जगणे एक आव्हान असले तरी, ते तुम्हाला अधिक शांत, आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यास मदत करेल.
--------
एकदा गण्याच्या बायकोने त्याला विचारलं,
अहो, जर मी तुम्हांला तीन-चार दिवस दिसले नाही, तर तुम्हाला कसं वाटेल?
गण्या : मग काय
बायको मला सोमवारी दिसली नाही.
मंगळवारी दिसली नाही.
बुधवारी दिसली नाही.
पूर्ण आठवडाभर दिसली नाही.
मग जशीजशी माझ्या डोळ्याची सूज कमी होऊ लागली,
तशीतशी ती मला दिसायला लागली!
--------
स्त्रीचा पदर!
स्त्रियांच्या ’पदरात’,
किती काय साठते.
आकाशालाही नमवेल,
इतके सामावत असते!
पदरालाच कळतो,
नजरेचा इशारा.
जाल जर वाटेला,
खैर नाही करणार!
पदराआडचे विश्व,
अगम्यच असते.
मनाच्या डोहातले,
अव्यक्तच राहाते!
उंबर्याच्या आतले,
पदरी दडलेले असते.
उंबर्याबाहेरचे मात्र,
पाखडलेले असते!
झाकलेल्या पदरात,
वज्र लपलेले असते.
अस्मानी वा सुलतानी,
तडीपार जाते!
ऊन पावसाला छाया,
मायेला आधार.
टिपायला नि निपटायला
सदैवच तयार!
पदर जणू की,
वत्सलता मूर्त.
अमृताच्या पान्हा,
कान्हा ही तृप्त!
घरदार जपताना,
एकच स्वप्न पदरात,
स्वस्थ रहा,सुखी असा,
हेच विणलेले असते!!
- सौ. शुभांगी जुमडे,मो : ९६०४३४५३२५
----------
Related
Articles
कच्छला भूकंपाचे धक्के
12 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
युक्रेनचा रशियावर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला
11 Mar 2025
वाचक लिहितात
12 Mar 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
08 Mar 2025
उत्तर प्रदेशात आठ वर्षांत २१० कोटी झाडे लावली
15 Mar 2025
कच्छला भूकंपाचे धक्के
12 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
युक्रेनचा रशियावर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला
11 Mar 2025
वाचक लिहितात
12 Mar 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
08 Mar 2025
उत्तर प्रदेशात आठ वर्षांत २१० कोटी झाडे लावली
15 Mar 2025
कच्छला भूकंपाचे धक्के
12 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
युक्रेनचा रशियावर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला
11 Mar 2025
वाचक लिहितात
12 Mar 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
08 Mar 2025
उत्तर प्रदेशात आठ वर्षांत २१० कोटी झाडे लावली
15 Mar 2025
कच्छला भूकंपाचे धक्के
12 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
युक्रेनचा रशियावर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला
11 Mar 2025
वाचक लिहितात
12 Mar 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
08 Mar 2025
उत्तर प्रदेशात आठ वर्षांत २१० कोटी झाडे लावली
15 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
3
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचे भर रस्त्यात अश्लील चाळे
4
येमेनजवळ चार नौका बुडून १८६ जण बेपत्ता
5
युक्रेनच्या वीज प्रकल्पांवर रशियाचे पुन्हा बाँब हल्ले
6
मणिपूरमध्ये एक हजारांवर बेकायदा शस्त्रे जमा