मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्को येथील ब्रिटनच्या दूतावासातील दोन अधिकार्यांची हकालपट्टी केली आहे. त्यांच्यावर हेरगिरी करत असल्याचा आरोप ठेवला आहे. हेरगिरी करुन रशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. त्यांना दोन आठवड्यांत देश सोडून जाण्याचे आदेश दिले असल्याची माहिती रशियाच्या परररष्ट्र खात्याने दिली. गेल्या वर्षी ब्रिटनच्या सात अधिकार्यांना अशाच प्रकारे हाकलून देण्यात आले होते. ते मॉस्को येथे बसून रशियातील गोपनीय माहिती ब्रिटनला पुरवत होते. त्यांच्या हालचालीवर गुप्तचर विभाग लक्ष ठेवून होता. त्याबाबतचे पुरावे हाती लागताच हकालपट्टीची कारवाई करण्यात आली असल्यचे वृत्त आरआयए नोवोस्तीने दिले आहे. अधिकार्यांनी रशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचे काम केले असल्याचा ठपका रशियाच्या परराष्ट्र खात्याने ठेवला होता.
Fans
Followers