नवी दिल्ली : न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लॅक्सन १६ मार्चपासून पाच दिवसांच्या भारत दौर्यावर येणार आहेत. व्यापार आणि गुंतवणुकीसह महत्त्वाच्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याला चालना देण्यासाठी लक्सन यांच्या भेटीचा उद्देश आहे.पंतप्रधान म्हणून लॅक्सन यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार,१७ मार्च रोजी लक्सन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भारत-न्यूझीलंड संबंधांवर चर्चा करतील. त्यानंतर १० व्या ’रायसीना डायलॉग’ च्या उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. लक्सन यांच्यासोबत त्यांच्या सरकारमधील मंत्री, वरिष्ठ अधिकारी, व्यापारी आणि भारतीय प्रवासी समुदायाचे सदस्य असलेले उच्चस्तरीय शिष्टमंडळ असेल. लॅक्सन १९ ते २० मार्च दरम्यान मुंबईला भेट देतील आणि नंतर वेलिंग्टनला परततील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही ते भेट घेणार आहेत.
Fans
Followers