भोपाळमध्ये व्यासपीठ कोसळून काँग्रेसचे सात नेते जखमी   

भोपाळ : मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळ येथे कार्यक्रमावेळी व्यासपीठ कोसळून काँग्रेसचे सात नेते जखमी झाले, अशी माहिती आमदार जयवर्धन सिंग यांनी दिली.सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार होता. राजमंगल चौकात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उभारले होेते. त्यावरून काँग्रेसचे नेते आंदोलकांना मार्गदर्शन करत होतेे.तेव्हा ते कोसळले. यानंतर कार्यकर्त्यानी विधानसभेवर मोर्चा काढला. पण, पोलिसांनी तो पाण्याचा फवारा मारुन अडविला. विधानसभेच्या परिसरात बॅरिकेड्स उभारले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना पुढे जाता आले नाही अश माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त रशमी अग्रवाल दुबे यांनी दिली. दुर्घटनेत किती जण जखमी झाले ? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, माहिती घेऊन मी सांगते. पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांनी देखील याबाबत मौन पाळले. टीटी नगरचे पोलिस अधिकारी चंद्रशेखर पांड्ये आणि ठाणे अंमलदार सुधीर अर्जारिया यांचे फोन बंद होते. 

Related Articles