मेट्रोच्या दोन मार्गांसाठी प्रस्ताव   

पुणे : पुणेकरांच्या मेट्रोसाठी राज्य सरकारच्या अंदाजपत्रकात ९८९७ कोटी रूपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग या दोन मार्गिकांसाठी हा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील सर्वच पुणेकरांना या मार्गिकांचा लाभ मिळणार आहे.
 
राज्याचा अकरावे अंदाजपत्रक सोमवारी सादर करण्याच आले. त्यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली. अर्थमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील दुसर्‍या टप्प्यातील मेट्रोच्या कामांची माहिती दिली. पहिल्या टप्प्यामध्ये पुण्यातील मध्यवर्ती भागात मेट्रोचे जाळे पसरलेले आहे. पुण्याच्या आजुबाजूला देखील मेट्रोचे जाळे पसरविण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन मार्गिका होणार आहेत. पुण्यात एकूण २३ किलोमीटरचा मार्ग खुला होणार आहे. सध्या दररोज दीड लाख पुणेकर मेट्रोने प्रवास करत आहेत. नवीन मार्ग सुरू झाल्यास या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
 
पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका आणि या प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे. पुणे मेट्रो टप्पा दोन अंतर्गत खडकवासला, स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग या दोन मार्गीकांच्या ९८९७ कोटी रुपयांच्या प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवलेला आहे. पुण्यात मेट्रोच्या काही मार्गिकांचे काम चालू आहे. येत्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी सरकार काही नव्या मेट्रो मार्गिकांचं बांधकाम सुरू करणार आहे. अनेक मेट्रो मार्गिका प्रस्तावित असून, त्यापैकी काही मार्गिकांना मंजुरी दिली आहे. या मार्गिकांच्या कामांना आता सुरुवात होणार आहे.
 
पुणे मेट्रो दृष्टीक्षेपात 
 
मार्गांची संख्या : ०२
एकूण स्थानके : ३०
भूमिगत स्थानके : ०५
कार्यरत स्थानके : २५
नेटवर्क लांबी (किमी) : ३३.१
 
सध्या सुरू असलेले मार्ग 
 
वनाझ ते रामवाडी
स्वारगेट ते पीसीएमसी

Related Articles