वडगावशेरीत पाणी टंचाई   

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार 

चंदननगर : वडगावशेरी परिसरात पाणी टंचाई आणि दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत. मात्र माजी नगरसेविका उषा  कळमकर आणि शीतल अजय सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच तक्रार केली.
 
वडगावशेरी, खराडी, विमाननगर, सोमनाथ नगर, गणेशनगर, या  भागात अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळित झाला तर काही भागात दुषित पाणी पुरवठा केला जात आहे. याकडे मुद्दाम महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आल्याने राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. अधिकारी आणि पाणी सोडणारी व्यक्तीच जाणूनबुजून कृत्रिम टंचाई करून काही भागात दुषित पाणी पुरवठा करत आहे. शिवाय टॅँकरच्या मालकाचा व्यवसाय वाढवा म्हणून वडगावशेरी परिसरात असा प्रकार सुरू असल्याची तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.  या प्रकरणी अजित पवार यांनी त्वरित दखल घेऊन महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क करून सूचना देण्यात आल्या. पाणीपुरवठा दोन दिवसात सुरळीत करण्यासाठी तातडीने पाउले उचलण्याचे आदेश दिले.

Related Articles