विभागीय लोकशाही दिनात चार प्रकरणांवर सुनावणी   

पुणे : विभागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित लोकशाही दिनात ४ प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. दरम्यान जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये विभागातील सर्व जिल्हाधिकार्‍यांनी स्वतः सुनावणी घेऊन प्रकरणे निकाली काढावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.यावेळी अपर आयुक्त समीक्षा चंद्रकार तसेच विविध विभागाचे विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारीवर निर्णय घेण्यासाठी दर महिन्याच्या दुसर्‍या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात येते.
 
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार निवारण न झालेल्या प्रलंबित २ व नव्याने दाखल झालेल्या २ प्रकरणांवर यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी अर्जदारांना त्याचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आणि सुनावणी घेतली. यात पुणे जिल्ह्यातील ३ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील १ प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. पुनर्वसन प्लॉटचा ताबा मिळण्याबाबत, पावसाळी नाला बांधकाम नकाशात न दर्शविल्यामुळे व साईड मार्जिनमध्ये येत असल्यामुळे बांधकाम परवानगीस स्थगिती देण्याबाबत ट्रक चोरी प्रकरणी कार्यवाही होण्याबाबत आदी तक्रारीवर सुनावणी घेण्यात आली.

Related Articles