अमिष दाखवून ११ लाखांची फसवणूक   

पुणे : क्रीडा साहित्याची फ्रॅन्चायसी आणि ग्राहक मिळवून देण्याचे अमिष दाखवून विश्वास संपादन करत व्यावसायिकाची ११ लाख ३५ हजारांची फसवणूक केली. जैनम राजेश शहा (वय २८, शुक्रवार पेठ, शिंदे आळी) यांनी याप्रकऱणी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला. हा प्रकार ३० सप्टेबर ते ५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान हा प्रकार घडला.
 
तक्रारदार शहा यांना समाजमाध्यमावर क्रीडा साहित्य फ्रॅन्याचसीसंदर्भात जाहिरात दिसली. त्या जाहिरातीमध्ये दरमहा ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून देण्याचे आणि ग्राहकदेखील देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी कंपनीचे फ्रॅन्याचसी मॅनेजर जय मश्रु यांच्याकडून सर्व माहिती घेतली. त्यानंतर, कंपनीने त्यांना सर्व कागदपत्रे पाठविली. त्यात फ्रॅन्याचसी मिळवण्यासाठी २ लाख रुपये भरण्यासाठी बँक खाते क्रमांक दिला होता. त्यावर तक्रारदार यांनी २ लाख रुपये पाठविले. त्यानंतर त्यांना जय मश्रु याने तुम्हाला २८ ग्राहक मिळवून दिले, असे सांगितले. 
 
कंपनीचे मालक प्रणव तलाठी याने सर्व क्रीडा साहित्याबाबतचे दर समजावून सांगितले. जय याने क्रीडा साहित्य करारनामा पाठवला. त्या करारनाम्यानुसार माल पाठविण्यासाठी त्यांना ९ लाख ३५ हजार २५० रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी आटीजीएसद्वारे पैसे पाठविले. त्यानंतर त्यांनी जय मश्रु व प्रणव तलाठी यांना वारंवार कॉल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही, तेव्हा आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे याप्रकऱणी अधिक तपास करत आहेत.

Related Articles