पुणे : परीक्षा जवळ आल्यामुळे तिचा अभ्यास सुरू होता आणि त्यामुळे, काही दिवस भेटणे जमले नाही. तसेच, फोनवर बोलणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे, चिडलेल्या प्रियकराने त्याच्याकडील आक्षेपार्ह चित्रफित समाजमाध्यमावर पसरवण्याची धमकी दिली. त्यानंतर, प्रियकर रविवारी पुण्यात आला आणि त्याने प्रेयसीला शिवीगाळ करून जबरदस्तीने मोटारीत बसवले आणि अपहरण करून चाकणच्या दिशेने जाण्यास सुरूवात केली. वाटेत तिला मारहाण करुन जखमी केले. तसेच, खूनाची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. याप्रकऱणी हडपसर पोलिसांनी प्रियकराला अटक केली.प्रज्वल कैलास मोहिते (वय २७, मोहितेवाडी, शेल पिंपळगाव, चाकण) असे या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी एका २६ वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मांजरी येथे रविवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला.तक्रारदार या मुळच्या नाशिक येथील असून, त्या शिक्षणासाठी पुण्यात आल्या आहेत. त्यासध्या मांजरी येथे भाड्याने खोली घेऊन राहत असून, त्यांची आरोपी प्रज्वल मोहिते याच्याशी २०२१ पासून ओळख होती. त्यांच्यात प्रेमसंबंधदेखील होते. प्रज्वलचा व्यवसाय आहे. दरम्यान, परिक्षा जवळ आल्याने तक्रारदार या अभ्यासामध्ये व्यस्त होत्या. त्यामुळे, त्यांचे प्रज्वल याच्याशी भेटणे झाले नाही़ तसेच, त्यांनी फोनवर बोलणे टाळत होत्या. दरम्यानच्या काळात प्रज्वल याने त्याच्याकडे असलेल्या तक्रारदार यांच्या आक्षेपार्ह चित्रफित समाजमाध्यमावर पसरवण्याची धमकी देत होता. प्रज्वल हा रविवारी त्या रहात असलेल्या घरी आला आणि वाद घालू लागला. त्यानंतर, तिचे केस ओढून हाताने मारहाण केली.
Fans
Followers