ओडिशात ४१ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे : माझी   

भुवनेश्वर : मागील दहा वर्षांत ४१ बांगलादेशी नागरिकांविरोधात गुन्हेगारी खटले  दाखल करण्यात आल्याची माहिती ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सोमवारी विधानसभेत दिली. भाजप आमदार मानस कुमार दत्ता यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना माझी म्हणाले, राज्यात एकूण ३ हजार ७३८ बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटली आहे. केंद्रपाडा येथे सर्वाधिक १ हजार ६४९, जगतसिंगपूरमध्ये १ हजार११२, मलकानगिरीमध्ये ६५५, भद्रकमध्ये १९९, नबरंगपूरमध्ये १०६ आणि भुवनेश्वरमध्ये १७ अवैध बांगलादेशी स्थलांतरित आढळले आहेत. 
 
राज्याच्या विविध भागात बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी तहसील, तालुका आणि पोलिस अधिकार्‍यांची पथके तयार करण्याच्या सूचना राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत.बालासोर जिल्ह्यात अद्याप एकाही अवैध बांगलादेशी स्थलांतरितांची ओळख पटलेली नाही. मात्र, जिल्ह्यात पाच बांगलादेशी नागरिकांवर अनेक गुन्हे दाखल असून, ही प्रकरणे विचाराधीन आहेत.

Related Articles