आमदार क्षीरसागर यांच्या स्वीय सहाय्यकाची व्यवस्थापकाला मारहाण   

बीड : बीडमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकार्यकर्त्यांनी एका शोरूम व्यवस्थापकाला बेदम मारहाण केली. यामध्ये क्षीरसागर यांच्या स्वीय सहाय्यकाचाही समावेश होता. यासंदर्भातील मारहाणीची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे.  
 
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील राजकीय नेत्यांचा आश्रय असलेल्या गुंडगिरीची सध्या जोरदार चर्चा आहे. धनजंय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराड याला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटक केल्यानंतर बीडमधील गुंडगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. असे असतानाच आता संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याकडून शोरूमच्या  व्यवस्थापकाला मारहाण करण्यात आल्याची चित्रफित समोर आली. त्यामुळे बीडमधील गुंडगिरी पुन्हा एकदा चर्चेत आली. सीसीटीव्ही फूटेजनुसार ही चित्रफित  १२ डिसेंबर २०२४ मधील असल्याचे सांगण्यात येत आहे.  
 
वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे अडचणीत आले. सतीश भोसलेमुळे आमदार सुरेश धस तर या मारहाणीमुळे संदीप क्षीरसागर अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. चित्रफितीमध्ये मारहाण करताना दिसणारी व्यक्ती माझा कार्यकर्ता नसल्याचे क्षीरसागर यांनी म्हटले आहे.  

Related Articles