लखनौ : वस्तू व सेवा कर उपायुक्त संजय सिंह यांनी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील सेक्टर ७५ मधील अॅपेक्स अँटिना सोसायटीमध्ये ही घटना घडली. संजय सिंह हे कर्करोगग्रस्त होते. तसेच दीर्घकाळापासून ते मानसिक तणावाखाली होते. त्यांची स्मरणशक्तीही कमी झाली होती. सोमवारी सकाळी ते इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर पोहचले आणि तिथून उडी मारून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
Fans
Followers