चॅम्पियन चषकाच्या विजयानंतर भारतीय संघाचे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन   

दुबई : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि सर्वांनीच जोरदार सेलिब्रेशन केले. रोहित शर्माने जय शहा यांच्या हातून चषक घेतला, तो उंचावला. पण त्यानंतर रोहितने तिरंगा हातात घेत एकट्याने एक खास गोष्ट केली. बर्‍याच जणांना रोहितच्या या गोष्टीचा अर्थ तेव्हा समजला नव्हता. पण आता ती गोष्ट समोर आली आहे.
 
रवींद्र जडेजाने चौकार लगावला आणि त्यानंतर स्टेडियमध्ये भारताच्या विजयाचा जयघोष झाला. विराट कोहली, रोहित शर्मा आणि भारताच्या सर्व खेळाडूंनी एकच कल्ला केला. सर्व खेळाडू स्टेडियममध्ये दाखल झाले. त्यानंतर प्रत्येक भारताचा खेळाडू एकमेकांना शुभेच्छा देण्यात गर्क झाले होते. त्याचबरोबर टीव्हीवरही हे खेळाडू आपल्या भावना व्यक्त करत होते. त्यानंतर स्टेडियममध्ये पोडियम सज्ज झाले आणि चॅम्पियन्स ट्रॉफी तिथे आणण्यात आली.
 
जय शहा आणि रॉजर बिन्नी यांनी भारताच्या सर्व खेळाडूंना मेडल्स दिली. त्यानंतर जय शहा यांनी रोहित शर्माला चषक दिला. रोहित शर्माने तो चषक स्विकारला आणि त्यानंतर तो आपल्या संघातील खेळाडूंमध्ये गेला. यावेळी रोहित शर्माने चषक उंचावला आणि भारतीय संघाने जोरदार सेलिब्रेशन केले. त्यानंतर प्रत्येक खेळाडूने आपल्या हातात चषक घेतला आणि त्यांनी फोटो काढले. त्यानंतर रोहित शर्माने हा चषक आपल्या हातात घेतला, तिरंगा त्याने आपल्या अंगाला लपेटला आणि तो मैदानातील खेळपट्टीवर जाऊन बसला. रोहित शर्माने खेळपट्टीवर चषक ठेवला आणि त्यानंतर त्याने एक खास पोझ दिली. लोकांनी रोहितचे कौतुक त्यावेळी केले, पण रोहितने असे का केले, हे कोणालाच समजले नाही. भारताचा तिरंगा यावेळी रोहित शर्माने दुबईत फडकवला आणि आम्ही क्रिकेटवर कसे राज्य करतो, हे रोहितने आपल्या कृतीमधून दाखवून दिले.
 
रोहित शर्माने यावेळी एक कर्णधार म्हणून एक मोठी गोष्ट यावेळी केल्याचे पाहायला मिळाले. कारण ही गोष्ट कोणालाही सुचणारी नव्हती आणि त्यामुळे रोहित शर्माने जी गोष्ट केली, त्याचं कौतुक आता सर्व स्तरावर होत असल्याचे आता होत असल्याचे समोर आले आहे.

Related Articles