E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Wrutuja pandharpure
11 Mar 2025
एका शिक्षकाने पाण्याने भरलेला पेला हातात घेऊन आपल्या वर्गातील शिकवणीला सुरुवात केली. त्यांनी तो पेला हातात वर उचलून सर्व विद्यार्थीना दाखवला आणि विचारले की या पेल्याचे वजन किती?
५० ग्रम . १०० ग्रम ..१२५ ग्रम विद्यार्थीनी उतरं दिले.
जोपर्यंत मी या पेल्याचे वजन करत नाही तोपर्यंत मला हे कसे कळणार कि त्याचे वजन किती.शिक्षक म्हणाले.
जर मी हा पेला थोडा वेळ असाचं उचलून धरू तर काय होईल?
काहीच नाही होणार असे विद्यार्थी म्हणाले.
हा पेला मी अजून एक तास उचलून ठेऊ तर काय होईल?असे शिक्षक म्हणाले.
तुमचा हात दुखेल असे एक विद्यार्थी म्हणाला.
खरे आहे पण हा पेला मी पूर्ण एक दिवस हातात धरून ठेवला तर काय होईल?
तुमचा हात सुन्न होऊ शकतो, तुमच्या मांशपेशीवर खूप ताण येऊ शकतो, हाताला लकवा मारू सकतो आणि यामुळे तुम्हांला इस्पिताळामध्ये जाणायची वेळ येऊ शकते असे एक विद्यार्थी म्हणाला आणि त्यांच्या या बोलण्यांवर काही विद्यार्थी हसू लागले.
खूपच छान पण या क्रियेमध्ये पेल्याचे वजन बदलले का? शिक्षक म्हणाले.
उत्तरं आले.. नाही.
तर मग हात दूखून, माझ्या मांशपेशीवर ताण का आला.
विद्यार्थीना या गोष्टीचे आश्चर्य वाटले.शिक्षकाने पुन्हा विद्यार्थीना विचारले या दुखण्यातून सावरण्यासाठी मी काय करू?
पेल्याला खाली ठेवा. एक विद्यार्थी म्हणाला.
अगदी बरोबर शिक्षक म्हणाले.
जीवनात येणार्या समस्या पण काहीशा अशाच आहेत.
या समस्या काही क्षण डोक्यात ठेवल्या तर तुम्हाला वाटेल सर्व ठीक आहे.
पण पुन्हा याच समस्या खूप वेळ तुमच्या डोक्यात ठेवा. जर तुम्ही या समस्या खूप वेळ डोक्यात ठेवल्या तर त्या तुम्हाला अपंग करतील आणि मग तुम्ही काहीच करू शकणार नाही.
आपल्या जीवनात येणार्या समस्यांवर विचार करण्याची गरज आहे पण जेव्हा आपण झोपायला जातो, तेव्हा या समस्यांवर जास्त विचार करू नये. यामुळे तुम्ही सकाळी उठल्यांवर तुम्हांला ताजे-तवाने वाटेल आणि समोरून येणार्या कोणत्याही समस्यांना सामोरे जाण्याची तुम्हांला शक्ती मिळेल.
---------
यश हे आपल्या जीवनातील मार्गदर्शक प्रकाशासारखे आहे. जेव्हा आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि मेहनत करत राहतो, तेव्हा यश आपल्यामागे येते, अगदी सावलीसारखं.
सावलीसारखा यश पकडण्याचा प्रयत्न न करता, आपला मार्ग चालत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. प्रकाशाच्या दिशेने चालत राहा आणि यश आपोआप तुमच्यासोबत येईल.
----------
दोन मित्र फोनवर बोलत असतात.
पहिला : हॅलो भाई, काय करतोस?
दुसरा : मस्त रे एकदम, काय म्हणतोस?
पहिला : अरे एक काम होते.
दुसरा : हा कर मग, थोड्या वेळाने निवांत बोलू.
----------
लोकमान्य टिळक यांच्या निर्वाणाने एका तेजस्वी युगाचा अंत झाला. संपूर्ण भारतवर्षाला शोकसागरात लोटणार्या त्या घटनेचे कवी वृजनारायण यांनी उर्दूमध्ये चटका लावणारे वर्णन केले आहे. आधुनिक भारतातील लोकमान्यांचे अद्वितीय स्थान या काव्य पंक्तींतून अधोरेखित होते.
- १ -
मौत ने रात के पर्दे मे किया कैसा वार
रोशनी सुबहे बनत की है मातम का गुबार
मारका सर्द है सोता है वतनका सरदार
तनतना शेर का बाक़ी नही सोयी है कछार
बेकसी छायी है तक़दीर फिरी जाती है
कौम के हाथ से तलवार गिरी जाती है
(रात्रीची संधी साधून मृत्यूने हा काय आघात केला आहे! आज झालेली ती पहाट आहे का शोकाचे लोट उठले आहेत? राष्ट्राचा सेनापती झोपला आहे. युध्द थंडावले आहे. सिंहाचे गर्जणे थांबले आहे. गुहा शांत आहे. चहूकडे उदास वातावरण पसरले आहे. नशीब फिरले आहे. राष्ट्राचे खड्ग निसटून हातातून पडत आहे.)
- २ -
उठ गया दौलते नामोस वतनका वारस
कौमे मरहूम के एजाज़े कुहनका वारस
जान निसारे अज़ली शेरे दकनका वारस
पेशवाबोंके गरजते हुये रणका वारस
थी समायी हुयी पूनाकी बहार आँखोमें
आखरी दौरका बाकी था खुमार आँखोमें
(आमच्या राष्ट्राच्या अब्रूचा राखणदार नाहीसा झाला. राष्ट्राची प्रतिष्ठा सांभाळणारा नाहीसा झाला. हा निष्ठावान पुरुष, दक्षिणच्या वाघाचा (छत्रपती श्री शिवाजी महाराज) वारस, पेशव्यांच्या गाजलेल्या रणांचा वारस नाहीसा झाला. पुण्याचे वैभव त्यांच्यात दिसत होते. गतकाळाचा रुबाब त्यांच्या डोळ्यांत दिसत होता.)
---------
Related
Articles
केंद्रीय विद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू
10 Mar 2025
बांगलादेशातील रोहिंग्या शिबिरांची युनोच्या प्रमुखांकडून पाहणी
15 Mar 2025
सर्वांसाठी एकच पेन्शन योजना लागू होणार
14 Mar 2025
बियर-दारू दुकानांसाठी आता सोसायटीची एनओसी लागणार
12 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
08 Mar 2025
केंद्रीय विद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू
10 Mar 2025
बांगलादेशातील रोहिंग्या शिबिरांची युनोच्या प्रमुखांकडून पाहणी
15 Mar 2025
सर्वांसाठी एकच पेन्शन योजना लागू होणार
14 Mar 2025
बियर-दारू दुकानांसाठी आता सोसायटीची एनओसी लागणार
12 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
08 Mar 2025
केंद्रीय विद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू
10 Mar 2025
बांगलादेशातील रोहिंग्या शिबिरांची युनोच्या प्रमुखांकडून पाहणी
15 Mar 2025
सर्वांसाठी एकच पेन्शन योजना लागू होणार
14 Mar 2025
बियर-दारू दुकानांसाठी आता सोसायटीची एनओसी लागणार
12 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
08 Mar 2025
केंद्रीय विद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू
10 Mar 2025
बांगलादेशातील रोहिंग्या शिबिरांची युनोच्या प्रमुखांकडून पाहणी
15 Mar 2025
सर्वांसाठी एकच पेन्शन योजना लागू होणार
14 Mar 2025
बियर-दारू दुकानांसाठी आता सोसायटीची एनओसी लागणार
12 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
08 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
3
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचे भर रस्त्यात अश्लील चाळे
4
येमेनजवळ चार नौका बुडून १८६ जण बेपत्ता
5
युक्रेनच्या वीज प्रकल्पांवर रशियाचे पुन्हा बाँब हल्ले
6
मणिपूरमध्ये एक हजारांवर बेकायदा शस्त्रे जमा