पिंपरी : नेहरूनगर येथे एका अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी नवीन पिंपरी कोर्टाजवळ केली.याप्रकरणी पोलीस अंमलदार विजय दौंडकर यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहरूनगर येथील नवीन कोर्टाजवळ एकजण गावठी कट्टा घेऊन आल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५१ हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. संत तुकाराम नगर पोलीस तपास करीत आहेत.
Fans
Followers