एसटी बसमध्ये विनयभंग करणारा जेरबंद   

भोर,(प्रतिनिधी) : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीमधून प्रवास करणार्‍या महिलेचा विनयभंग करणार्‍याला जेरबंद करण्यात राजगड पोलिसांना शनिवारी यश आले आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कमलेश प्रल्हाद शिरसाठ (वय ४१, रा.आंबेगाव, पुणे, मुळ रा.बदलापूर ईस्ट, जि. ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला एसटीमधून सुरूर ते कात्रज पुणे ५ मार्च रोजी रात्रीच्या वेळी प्रवास करीत होत्या. दरम्यान शिरवळ मध्ये एक अनोळखी व्यक्ती एसटीमध्ये चढला. तो फिर्यादीच्या उजव्या बाजूच्या सीटवर बसला. त्याने फिर्यादीकडे बघून लैंगिक, शारीरिक हालचाली केल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक राजेश गवळी, अजित पाटील, अक्षय नलावडे आदींनी सातारा ते चीसी मार्गावरील महत्वाचे ठिकाणचे १०० सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यानुसार कमलेशला ताब्यात घेतले.

Related Articles