अनीसुर रहमान आणि मदन सोनी यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठी पुरस्कार   

नवी दिल्ली : साहित्य अकादमीने २०२४ चे अनुवाद पुरस्कार शुक्रवारी जाहीर केले. इंग्रजी भाषेत हा पुरस्कार अनीसुर रहमान यांना तर हिंदी भाषेत हा पुरस्कार मदन सोनी यांना जाहीर झाला आहे.
 
साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली येथील रवींद्र भवन येथे काल कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत २१ भाषेतील अनुवाद पुरस्कार जाहीर करण्यात आले.  स्मृतिचिन्ह, ५० हजार रुपये रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्कृत आणि नेपाळी भाषेतील पुरस्कार नंतर जाहीर केले जातील, असे साहित्य अकादमीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. अनीसुर यांना ‘हजारों ख्वाईशें ऐसी’ (द वंडरफुल वर्ल्ड ऑफ उर्दू गझल) या अनुवादित काव्यसंग्रहाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.  सोनी यांना यशोधरा दालमिया यांच्या ‘सय्यद हैदर रजाः एक अप्रतिम कलाकार की यात्रा’ या अनुवादित कलाकृतीसाठी मिळाला आहे. 

Related Articles