तरूणीचा प्रतिबंधात्मक आदेशाचा अर्ज फेटाळला   

पुणे : स्वारगेट बस स्थानकात अत्याचार झालेल्या तरुणीचे चारित्र्यहनन करणार्‍या खोट्या व असंवेदनशील वक्तव्यांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी तिच्या वकिलांनी केलेला प्रतिबंधात्मक आदेशाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार, जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाअधिकार्‍यांना या संदर्भात आदेश काढण्याचे विशेष अधिकार राज्य सरकारने दिले आहेत, असे नमूद करत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांनी हा अर्ज फेटाळला आहे. स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये 
 
आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे (वय ३६) याने तरूणीवर अत्याचार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी गाडेला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुुनावली आहे. अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर काही राजकारणी, पोलीस अधिकारी यांच्याकडून तरूणीच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी विधाने करण्यात आली होती. वकील असीम सरोदे यांनी केलेल्या अर्जावर नुकतीच सुनावणी झाली होती. 

Related Articles